नागपूर, 7 मे: महाराष्ट्रात कोरोना (Corona) बाधितांच्या वाढत्या संख्येसोबतच वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen Shortage) निर्माण झाला. यामुळे राज्याने विविध ठिकाणांहून ऑक्सिजन मागवण्यास सुरूवात केली. मात्र, असे असताना महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन (Maharashtra Oxygen) गुजरातला (Gujarat) पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. भिलाई येथून महाराष्ट्रातील नागपूरला वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन चार टँकर्स येत होते. मात्र, हे टँकर्स गुपचूप गुजरातच्या दिशेने नेत असल्याचा प्रकार समोर आला. 5 मे रोजी दोन ऑक्सिजन टँकर्स गोंदिय जिल्ह्यातील देवरी बॉर्डरवर पकडण्यात आले तर 6 मे रोजी दोन टँकर्स औरंगाबाद आणि जालना या दरम्यान पकडण्यात आले आहेत. आता चारही ऑक्सिजनचे टँकर्स हे नागपूर प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत.
भिलाईहून नागपूरला येणारे ऑक्सिजन टँकर गुजरातला नेण्याचा कट उघड#oxygentankers #Nagpur #Maharashtra #Gujarat pic.twitter.com/NpMBK1EG7p
— News18Lokmat (@News18lokmat) May 7, 2021
महाराष्ट्रासोबतच गुजरातमध्ये सुद्धा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यामुळे तेथेही वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, असे असले तरी महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन तेथे कुणाच्या सांगण्यावरुन नेण्यात येत होता असा प्रश्न उपस्थित होत आहे. उल्हासनगर RT-PCR स्वॅब स्टिक पॅकिंग प्रकरण; अखेर ठेकेदार मनीष केशवानीला अटक राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा होणार दूर राज्यात निर्माण झालेल्या वैद्यकीय ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए ) बसविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 38 पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे 53 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 1250 मेट्रीक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादीत असून त्याची मागणी 1750 मेट्रीक टन एवढी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी साठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

)







