मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राष्ट्रवादी आणि सेनेच्या कार्यकर्ते निवडणूक कार्यालयात भिडले, खुर्च्याने केली मारामारी VIDEO

राष्ट्रवादी आणि सेनेच्या कार्यकर्ते निवडणूक कार्यालयात भिडले, खुर्च्याने केली मारामारी VIDEO

निवडणूक कार्यालयात दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले.

निवडणूक कार्यालयात दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले.

निवडणूक कार्यालयात दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले.

भिवंडी, 06 जानेवारी : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या (gram panchayat election 2021) रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी गावात वाद होऊ नये म्हणून बिनविरोध निवडणुकीवर भर दिला जात आहे. पण भिवंडी तालुक्यातील 56 ग्रामपंच्यातीच्या निवडणुकांना राड्याने सुरुवात झाली आहे. सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोरच भिडले.

भिवंडी तालुक्यातील भादवड येथील निवडणूक कार्यालयात निंबवली गावातील राष्ट्रवादी आणि सेनेचे उमेदवार समोर येताच निवडणुकीच्या वादातून दोघांचा चांगलाच राडा झाला.  निवडणूक कार्यालयात दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली. एवढंच नाहीतर एकमेकांवर खुर्च्यांनी हल्ला केला.

गणेश गुळवी आणि प्रविण गुळवी अशी दोघांची नावं आहे. दोघांना एकच चिन्ह आल्यामुळे दोघांमध्ये वाद पेटला होता. त्यानंतर रुपांतर हाणामारीत झाले. विशेष म्हणजे, हे दोघेही नातेवाईक असून एकाच कुटुंबातील आहे.

ग्रामपंचायत निवडणूक सुरू झाल्यापासून ही चौथी घटना आहे. पाहिली घटना गुंदवली इथं चौघांना मारहाण झाली होती त्यानंतर काल्हेरचे शिवसेनेचे शाखाप्रमुख यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. तर खारबाव इथं उमेदवाराची कार जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मंगळवारी तर निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहण्यास मिळाला.

First published:

Tags: NCP, Shivsena