मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ, भाजप नगरसेवक पोहोचले शिवसेना नेत्यांच्या दरबारी

नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ, भाजप नगरसेवक पोहोचले शिवसेना नेत्यांच्या दरबारी

नवी मुंबईतील सेना भाजपच्या या अघोषित युतीमुळे शहरात या नव्या चर्चेला उधाण आले आहे.

नवी मुंबईतील सेना भाजपच्या या अघोषित युतीमुळे शहरात या नव्या चर्चेला उधाण आले आहे.

नवी मुंबईतील सेना भाजपच्या या अघोषित युतीमुळे शहरात या नव्या चर्चेला उधाण आले आहे.

नवी मुंबई, 18 ऑक्टोबर : नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकांच्या गोटात खळबळ माजली आहे. भाजपमधील काही माजी नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामे भाजपचेच नेते होऊ देत नसल्याने नाराज भाजप माजी नगरसेवकांनी शिवसेने नेत्याच्या दरबारी हजेरी लावली आहे. एवढंच नाही तर या माजी नगरसेवकांच्या हाकेला शिवसेना नेते धावत येऊन प्रभागातील विकास कामे ही झटक्यात करून दिल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबईतील सेना भाजपच्या या अघोषित युतीमुळे शहरात या नव्या चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वीच नवी मुंबईतील भाजप नगरसेवकांचा एक गट नाराज आहे. त्याच्या प्रभागातील कामे सत्ता असताना देखील होत नव्हती. फक्त मर्जीतल्या नगरसेवकांचीच कामे होत असल्याने नाराज नगरसेवक अस्वस्थ होते. याबाबतची तक्रार नागपूरच्या भाजपच्या दरबारापर्यंत पोहचली होती. त्या वेळी या सर्व नाराजांना धीर देण्यात आला.

महाराष्ट्रावर पावसाचे संकट वाढले, पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

मात्र, या घटनेनंतर देखील परिस्थिती सुधारत नाही हे पाहता आणि जर का प्रभागातील विकास झाले नाहीत तर निवडणुकांमधून निवडून कसं यायचं असा प्रश्न हे नाराज नगरसेवक व्यक्त करत आहेत.

आता नवी मुंबईच्या महापालिकेत प्रशासकाची नियुक्ती असल्याने याचीच संधी साधत या नगरसेवकांनी थेट शिवसेना नेत्यांच्या दरबारीच हजेरी लावली आणि आपल्या प्रभागातील कामे करून घेतली. या कामांमधून नाराज नगरसेवकांचा फायदा झालाच पण शिवसेनेच्या नेत्यांनी ही या कामांमधून आपलं ही चांगलंच चांगभलं करून घेतलं असल्याची चर्चा ही नवी मुंबईत रंगली आहे.

या कामात महापालिकेच्या एक बड्या अधिकाऱ्यामुळे लाखमोलाच्या 70 मोदकांचा नैवद्य हा शिवसेनेच्या नेत्याला मिळाला असल्याची ही चर्चा आहे. या मदतीतूनच या नेत्याचं चांगभलं झाले असल्याचे पुढे आले. मात्र, या नाराज नगरसेवकांचा नाराजीचा सूर पाहून आगामी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या सर्व घडामोडी महत्वाच्या ठरणार आहेत.

हेलिकॉप्टरमधून उतरताच शरद पवारांनी पहिले कार्यकर्त्यांना बजावले, पाहा हा VIDEO

दोन दिवसांपूर्वीच भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील शहरातील सिडको निर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी 4 एफएसआय मिळावा तसंच महापालिकेतील 8 कोटींच्या उद्यान घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यामुळे नवी मुंबईतील भाजपच्या गोटात नक्की चाललंय काय असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे.

लवकरच भाजपच्या प्रदेश पक्षश्रेष्ठींनी या घडामोडींकडे लक्ष नाही दिला तर मात्र आगामी महापालिका निवडणुकांमध्ये या सर्व नाराजीचे सूर उमटताना दिसतील असे जाणकारांचे म्हणणं आहे.

First published:

Tags: BJP