प्रमोद पाटील, प्रतिनिधी नवी मुंबई, 13 एप्रिल : राज्यात एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बातम्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाने मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसेचे उप शहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. नवी मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबई मनसेचे उप शहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. घोरपडे यांनी नवी मुंबई मनसे शहर प्रमुख गजनान काळे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. (आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना जशास तसे उत्तर, ‘मातोश्री’वर बोलावल्याची तारीखच सांगितली!) त्यांनी आपली तक्रार वरिष्ठापर्यंत पोहोचवली होती. लक्ष घालण्यासाठी पक्षश्रेष्ठींना विनंती सुद्धा केली होती. पण जवळपास दीड महिन्यात काहीच झाले नसल्याचे दिसून आले. आज शेवटी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. घोरपडे यांच्या प्रवेशामुळे मनसेला धक्का मानला जात आहे. काय केले होते आरोप? नवी मुंबई उपशहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांच्यासह अन्य पाच जणांनी शहर प्रमुख गजानन काळे यांच्या जाचाला कंटाळून आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे दिले होते. यात प्रवीण गाडेकर, उप विभाग अध्यक्ष, चंद्रकांत सकपाळ, उप विभाग अध्यक्ष, रोहन चव्हाण, सुशांत सैद, रोहित सैद सर्व शाखा अध्यक्ष यांचा समावेश होता. या सर्वांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपण गजानन काळे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपल्या पदाचे राजीनामे देत असल्याचे सांगितलं होतं. त्या संदर्भात आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन गजानन काळे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोपही केले होते. ( (‘आता गमनं झाली तर…’, राष्ट्रवादी फुटीच्या चर्चांवर जयंत पाटलांची गुगली) ) ‘आम्हाला पक्षात काम करण्याचे स्वातंत्र्य नाही, काही बोलता येत नाही, काही करताही येत नाही. एखाद्या समाजोपयोगी कामा संदर्भात नवी मुंबई महानगर पालिकेसोबत पत्र व्यवहार केल्यावर,आम्हाला पालिकेचे अधिकारी कोणताही प्रतिसाद देत नाहीत,आम्ही विचारणा केल्यावर शहर प्रमुख यांच्यासोबत आर्थिक हीत सबंध असल्याचे सांगून आम्ही या संदर्भात काहीच करू शकत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आपण पदावर असल्याने जनेतेला न्याय देता येत नाही. त्यामुळे पदावर राहून काय उपयोग म्हणून मी पदाचा राजीनामा दिल्याचे घोरपडे यांनी सांगितले. गजानन काळे यांचे आर्थिक हितसंबंध? गजानन काळे यांचे इतरांशी आलेले आर्थिक हितसंबंध मी अनेक वेळा वरिष्ठ नेत्यांना सांगितले. मात्र, यावर त्यांनी त्यांचा नाइलाज म्हणून कदाचित मला काहीच प्रतिसाद दिला नाही. उलट यामुळे गजानन काळे यांनी मला माझ्या कार्यालयात येऊन धमकी देऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी त्यावेळी पक्षाचा पदाधिकारी असल्याने प्रकरण दाबले. मात्र, आता हे सर्व असह्य झाले असल्याने मी आणि माझे आणखी पाच जणांनी पदाचा राजीनामा दिला आहे की आम्हाला गजानन काळे यांच्या सोबत काम करण्यास असंख्य अडचणी होत आहेत. मात्र अजूनही आम्ही अन्य पक्षात जाण्याचा विचार केला नसून,पक्षाचे सदस्य म्हणून काम करत राहू,मात्र पुढे याबाबत निर्णय घेतला जाईल, असे घोरपडे यांनी स्पष्ट केलं होतं.