मुंबई, 13 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असून 20 आमदारांचा गट बंड करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरू असतानाच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सूचक विधान केलं आहे. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. ‘हे सगळे भाजपमध्ये येऊन भाजपचं काँग्रेसीकरण चाललं आहे. भाजपचे बिचारे नेते मागच्या बाकावर आहेत आणि आमच्यातून गेलेले पहिल्या बाकावर दिसत आहेत’, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. राष्ट्रवादीसोबतही ‘शिंदे’ प्रयोग सुरू! ठाकरे-पवार भेटीनंतरचा खळबळजनक गौप्यस्फोट एकनाथ शिंदेंचं तिकडे गमन झालं त्यावर लोकांची जी प्रतिक्रिया आहे, ती आपण समाजात बघतो. आता आणखी काही गमनं झाली तर त्याची प्रतिक्रिया काय येईल, याचा परिणाम भाजपवर काय होईल? असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला. येत्या काळात गमनं होतील का? असा प्रश्न विचारला असता, मीडियामध्ये जे येतं ते आम्ही वाचतो, आम्हाला काही माहिती नाही. तुम्ही एक-दोन हजार व्यक्तींचा सर्व्हे केला तर भाजपचं रेटिंग फार खाली गेलं आहे, असं उत्तर जयंत पाटील यांनी दिलं.
2019 ला माणूस थांबायला तयार नव्हता, दिसेल तो माणूस तिकडे निघाला होता. निवडणुकांनंतर आम्ही 54 आणि काँग्रेस 44 वर गेली. आमचे 98-100 आमदार निवडून आले, याची आठवणही जयंत पाटलांनी करून दिली. लोकांना गृहित धरून राजकारण करायला लागलो, तर ते राजकारण फेल व्हायला लागतं, असं जयंत पाटील म्हणाले. शरद पवारांची नो कमेंट राहुल गांधींसोबत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला मला ही बोलवलं होत, पण मला इथे काही कामं होती. मी उद्या दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहे, आम्ही सगळे त्यांच्यासोबतच आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे अजित पवार भाजपसोबत जाणार का या प्रश्नावर मात्र शरद पवार यांनी बोलंण टाळल्यानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.