मुंबई, 13 एप्रिल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ‘जर तुम्हा मला लहान आहे असं म्हणत आहात तर मग मी मोठा झालो तर किती घाबरतील’ असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिदेंना सणसणीत टोला लगावला. हैदराबादच्या गितम विद्यापीठाने आयोजित कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा गौप्यस्फोट केला. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली. पण आदित्य ठाकरेंनी त्यांना जशास तसे उत्तर दिलं.
‘मी पहिल्या दिवशी बोललो होतो आम्ही वर्षावर होतो तेव्हा त्यांना घरी बोलवलं होतं. तेव्हा त्यांना विचारलं की, गद्दारी का करायची आहे बंडखोरी का करायची आहे. पक्ष सोडून जावं वाटतंय की, मुख्यमंत्री व्हायचं आहे. संजय राऊत साहेबांनी पण सांगितलं. पडद्याच्या आड चाललं होतं. अनेक गोष्टी कानावर आल्या होत्या म्हणून 20 मेला त्यांना उद्धव साहेबांनी भेटायला बोलवलं होतं, असं पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी सांगितलं. (‘आता गमनं झाली तर…’, राष्ट्रवादी फुटीच्या चर्चांवर जयंत पाटलांची गुगली) ‘महाराष्ट्राचं चांगल व्हावं हीच इच्छा आहे. हृदयात राम आणि हातात काम ही परिस्थिती राहिली पाहिजे. शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही, महिला अत्याचार वाढले आहेत. कोणावर अन्याय होऊ नये हेच आमचे हिंदुत्व आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
विधवा महिलांनाबाबत सरकारने नवीन असं करू नये महिलेला मान सन्मान मिळाला पाहिजे. हे असा आदेश योग्य नाही, असं मतही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. (आता ‘मविआ’ची वज्रमूठ नागरिकांच्या कचाट्यात; सभेविरोधात स्थानिक रस्त्यावर) व्हू इज धंगेकर हे विचारणारे त्यांना उत्तर दिलं आहे, आणि आता येणाऱ्या निवडणुकीत त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल, लोक उत्तर देतील, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना लगावला. रोशनी शिंदे हल्ला प्रकरणातील हल्लेखोर आहेत त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल नाही. रोशनीताई हॉस्पिटलमध्ये असताना पोलीस ठेवले जात आहे. ‘भाजपची गद्दारांमुळे नाचक्की होत आहे. आमच्यासोबत जे झालं ते केव्हाही भाजपसोबत होऊ शकतं. केसरकर यांच्यावर काय बोलायचं ते बाळासाहेबांच हिंदुत्व आम्हाला शिकवत आहे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.