कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर नवरात्र काळात बंद राहणार, देवस्थान समितीचा मोठा निर्णय

कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर नवरात्र काळात बंद राहणार, देवस्थान समितीचा मोठा निर्णय

नवरात्रौत्सवात सर्व विधीचे थेट प्रक्षेपण कोल्हापूर शहरातील विविध चौकात होईल

  • Share this:

कोल्हापूर, 9 ऑक्टोबर: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्र उत्सवाबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं मोठा निर्णय घेतला आहे. अंबाबाई मंदिर नवरात्र काळात भाविकासाठी बंद राहणार आहे. यंदाचा नवरात्रौत्सव लोकसहभागाशिवाय करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.

हेही वाचा...पुण्यातील धक्कादायक घटना! ते मूल माझं नाही, म्हणत पती घालायचा वाद, नंतर पत्नीनं केलं असं...

परंपरेप्रमाणे नवरात्रौत्सवात सर्व विधी करण्यात येतील.  मंदिरात 9 दिवस धार्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. मंदिराला विद्युत रोषणाई केली जाणार आहे. मात्र, नवरात्रौत्सव काळात मंदिराचे चारही दरवाजे बंदच राहतील. नवरात्रौत्सवात सर्व विधीचे थेट प्रक्षेपण कोल्हापूर शहरातील विविध चौकात होईल, अशी माहिती महेश जाधव यांनी दिली आहे. मंदिर दररोज सॅनिटाईझ केलं जाणार आहे.

यंदाच्या नवरात्रोत्सवात पालखी, अंबाबाईची पूजा, नगरप्रदक्षिणा यावेळी देखील भाविकांना उपस्थित राहता येणार नाही. देवीची रोज विविध रूपात पूजा करण्यात येईल. त्याचे दर्शन भाविकांना व्हावे यासाठी थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नवरात्रौत्सवाचं थेट प्रक्षेपण

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवरात्रोत्सवाचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भाविकांसाठी कोल्हापूर शहरातील विविध चौकांत मोठ्या स्क्रीन लावण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भाविकांना त्याचा लाभ घ्यावा, अशी माहिती महेश जाधव यांनी दिली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम रद्द..

दरवर्षी मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मात्र, कोरोनामुळे यंदा ते रद्द करण्यात आले आहेत. मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी नियोजन करण्यास पोलीस , आपत्कालीन विभाग यांचीही आज बैठक घेण्यात आली. यंदा नगरप्रदक्षिणासाठी पालखी वाहनातून नेण्यात येणार आहे. टेंबलाईवाडी येथे होणारा कोवाळ पंचमीचा कार्यक्रम ठराविक भाविकांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा...कोरोनामुळे गमवावी लागली नोकरी? या सोप्या मार्गांनी करा खर्चाचं नियोजन

10 कोटी रुपयांचं उत्पन्न घटलं

कोरोनामुळे कोल्हापूर अंबाबाई मंदिरचं गेल्या 7, 8 महिन्यात सुमारे 10 कोटी रुपयांचं उत्पन्न घटलं आहे. तरी देखील देवस्थान समितीनं कोरोनाच्या काळात राज्य सरकारला मदत केल्याची माहिती महेश जाधव यांनी दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 9, 2020, 1:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या