नाशिक 11 जानेवारी : शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी न लागणे किंवा कमी पगाराची नोकरी लागणे हा प्रकार अनेकांच्याबाबत घडलेला आहे. काही जण या अपयशामुळे निराश होतात. या निराशेत त्यांचा पाय आणखी खोलात जातो. तर काही जण या प्रतिकुल परिस्थितीमध्येही डोकं चालवतात. जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर एखादा व्यवसाय सुरू करून त्यामध्ये ते यशस्वी होतात. नाशिकचा संकेत क्षीरसागरही असाच एक यशस्वी तरूण आहे. कसा सुरू झाला प्रवास ? संकेतनं नाशिकच्या औरंगाबाद रोड परिसरात अनोखी चाय टपरी सुरू केली आहे. चारचाकी वाहनावर चहाच्या कपाची प्रतिकृती साकारत त्यानं ही चाय टपरी बनवलीय. ही चाय टपरी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे. उच्चशिक्षित तरुणाने नोकरी नाही लागली म्हणून हतबल न होता नाशिकच्या औरंगाबाद रोड परिसरात अनोखी चाय टपरी सुरू केली आहे.ही चाय टपरी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे. दूरवरून दिसनारा हा चहाचा कप सर्वांना आकर्षित करतो. चहाची क्वालिटी ही भन्नाट असल्यामुळे अनेक जण चहाचा अस्वाद घेतात, अशी माहिती संकेतनं दिली. Video : नोकरीच्या मागे न लागता उभारलं पान स्टॉल, मामा भाच्याची लाखोंची कमाई चहाचा व्यवसाय ही संकेतची पहिली चॉईस नव्हती. तो मुळचा चांदवड तालुक्यातील दुगावचा रहिवासी आहे. त्याचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे दुगावमध्येच झालं. बारावीपर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण घेतल्यानंत संकेतनं आयटीआय केलं. एका खासगी कंपनीत कमी पगारावर नोकरी केली. घरची परिस्थिती बेताची,आई वडील शेतकरी असल्यामुळे संकेतला घरी देखील आर्थिक मदत करावी लागत होती. खासगी कंपनीत काही वर्षांचा अनुभव मिळाल्यावर त्यानं चांगल्या पगाराची नोकरी मिळावी यासाठी बरेच प्रयत्न केले. दुर्दैवानं त्याचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले.
चांगल्या नोकरीच्या शोधात बरेच दिवस गेले मात्र नोकरी काही मिळाली नाही मग काय करायचं ? असा प्रश्न संकेतला सतावत होता. त्यावेळी चहाचा व्यवसाय सुरू करण्याचं त्यानं ठरवलं. पण, गल्लोगल्ली चहा मिळत असल्यानं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला काही तरी वेगळं करावं लागेल, हे संकेतला लक्षात आले. संकेतने मित्रांच्या मदतीने चहाच्या कपाची प्रतिकृती साकारण्याच ठरवलं. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पैसे कुठून आणणार? हा प्रश्न त्याच्यसमोर होता. संकेतला मित्रांनी या खडतर परिस्थितीमध्ये साथ दिली. संकेतचा हा व्यवसाय स्थिर झाला असून त्यामधून त्याची चांगली कमाई होत आहे.
Video : आईनं दिलेल्या सिक्रेट रेसिपीतून सुरू केलं हॉटेल, कुरकुरीत मूग भज्यातून लाखोंची कमाई
हतबल होऊ नका! संकेतकडं नोकरी नव्हती तेव्हा तो अजिबात डगमगला नाही. त्यानं व्यवसाय करण्याचं ठरवलं. हा व्यवसाय हटके पद्धतीनं केला तरच आपल्याकडं ग्राहक येतील हे त्याला आधीच माहिती होतं. त्यामुळे त्यानं सुरूवातीपासूनच तसे प्रयत्न केले आणि तो यशस्वी झाला. नोकरी मिळत नाही म्हणून निराश होऊन टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी संकेतचा हा प्रवास समजून घेतला पाहिजे. त्याच्या या यशस्वी प्रवासातून त्यांना नवं काही करण्याची प्रेरणा मिळेल.
गुगल मॅपवरून साभार

)







