बीड, 10 जानेवारी : हिवाळा आणि कुरकुरीत, गरमागरम भजी हे समीकरण फारं जुने आहे. भजे म्हणलं की तोंडाला पाणी सुटते. अनेक ठिकाणी वेगवेगळे पद्धतीची भजी खाण्यासाठी मिळतात. बटाटा भजी, आलू भजी, मिरची भजी आणि साधी भजी नेहमीच खवय्यांना आकर्षित करतात. मात्र, बीड मध्ये मिळणाऱ्या मुगाच्या भज्याची चव न्यारीच आहे. नागरिक गर्दी करून येथील स्वादिष्ट भज्यांचा आस्वाद घेतात. बीड शहरातील नगर नाका परिसरामध्ये शशिकांत रसाळ यांनी 1999 च्या सुमारास समर्थ भजी आणि वडापावच्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी शहरात अनेक ठिकाणी भज्यांची विविध प्रकार मिळत होती. मात्र, मूग भजी हा पदार्थ अनेकांना माहीत नव्हता. आईने दिलेल्या सिक्रेट रेसिपीतून रसाळ यांनी मूग भजीच्या विक्रीला सुरू केली. हळूहळू अनेकांना या वेगळ्या भज्याची चव आवडत गेली.
200 प्लेटची विक्री सुरुवातीला मूग भजीची प्लेट 20 रुपयाला होती. मात्र मागील तेरा वर्षांपासून आज ही मूग भज्याची प्लेट 20 रुपयालाच आहे. सुरुवातीला दिवसाकाठी 30 ते 40 प्लेटची विक्री होत होती. आता दीडशे ते दोनशे प्लेटची विक्री होते. एक किलोच्या भज्यापासून झालेली सुरुवात आता दिवसाकाठी 60 किलोचे भजे बनवले जात आहे. संक्रांतीत तोंड गोड करणारी गुळाची चिक्की कशी बनते? पाहा Video घरगुती सिक्रेट मसाले भजे बनवण्यासाठी मुगाची डाळ तीन ते साडेतीन तास भिजवली जाते. मिक्सरच्या माध्यमातून ही डाळ बारीक केली जाते. त्यामध्ये घरगुती मसाल्यांचे मिश्रण टाकले जाते. कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी, हिरवी मिरची, लसूण यामुळे भज्याची चव अप्रतिम होते.

)







