अहमदनगर, 11 जानेवारी : आपल्या देशात विड्याच्या पानाचे शौकीन खूप आहेत. अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक संदर्भ या पान खाण्याशी जोडलेले आहेत. पानावर आधारित चित्रपटातील गाणे देखील तयार झालेली आहेत. पान खाण्याचा शौक असलेली दर्दी मंडळी नित्यनेमाने एखाद्या दुकानात जाऊन पानाचा आस्वाद घेतात. याच पानाचा व्यवसाय थाटून नगर मधील एका उच्चशिक्षित तरुणानं चांगली कमाई सुरू केली आहे. बी. कॉम शिक्षण झालेल्या एका तरुणानं स्वतःचा जामखेडच्या मेन रोड वर पान स्टॉलचा व्यवसाय सुरू केला. हिरा मोती असं भन्नाट स्टाॅलला नाव देऊन फुलचंद आणि रामप्यारी असे विशेष पानासह इतरही प्रकारच पान विक्रीसाठी ठेवले. पान शॉपच्या माध्यमातून तो लाखो रुपये कमावत आहे. काही महिन्यापूर्वी सुरू केलेल्या व्यवसायाने चांगली भरारी घेतली आहे. त्याच्याकडे उपलब्ध असणारे वेगवेगळ्या पानांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. नगर शहरात लहानाचा मोठा झालेला ऋषिकेशने बी. कॉम पर्यंतच शिक्षण घेतलं आहे. शिक्षणानंतर नोकरीच्या माने न लागता स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. व्यवसायाच्या सुरुवातीला अनेकांनी अनेकांनी टोमणे मारले, शिक्षण घेऊन पानटपरी चालतो म्हणून अनेकांनी हिणवलं. मात्र, ऋषिकेशने या सगळ्या गोष्टींकडं लक्ष दिलं नाही. तो शांतपणे काम करत होता. जास्तीत जास्त नवनवीन पान आपण आपल्या ग्राहकांना देऊ यासाठी तो प्रयत्नशील राहिला.
रामप्यारी पान ऋषिकेश वराट या युवकाने सुरू केलेल्या पान शॉपला दिवसाला अनेकजण पान खाण्यासाठी येतात. त्यांच्याकडे अनेक पान मिळतात. त्यात अनेक व्हरायटी सुद्धा आहेत. या ठिकाणी चॉकलेट पान देखील मिळतं म्हणून बच्चे कंपनी देखील येथे पान खाण्यासाठी येत असतात. येथील फुलचंद आणि रामप्यारी पान खास असून शहरात येणाऱ्या अनेक पाहुणे मंडळी देखील या पानाचा आस्वाद घेतात. तुम्ही छोड्याची खिचडी खाल्लीय? आजारपणातही आहे उपयोगी, Recipe Video लाखोंची कमाई ऋषिकेश या व्यवसायातून दिवसाला नऊ ते दहा हजारांची विक्री करतो. त्याची कमाई बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे त्याच्या प्रति पूर्वीचे अनेकांचे मत बदलले आहे. ऋषिकेशकडे मिळणाऱ्या पानाची क्वालिटी पाहता एकदा आलेला व्यक्ती पुन्हा पुन्हा येतो आहे. ऋषिकेशला या कामांमध्ये आनंदही मिळतो, पैसेही मिळतात यामुळे तो समाधान व्यक्त करतो.

)







