मनमाड, 08 ऑक्टोबर : नाशिक जिल्ह्यामध्ये आजचा दिवस आगीच्या घटनाचा दिवस ठरला आहे. खासगी ट्रॅव्हल्स बसला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता मनमाडजवळ पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलेंडर घेऊन ट्रकला अपघात झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. एकापाठोपाठ स्फोटानंतर सिलेंडर आकाश उडाले. गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना मनमाडपासून जवळ पुणे-इंदौर महामार्गांवर घडली. आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे यामार्गांवरील वाहतूक 2 किमी लांब रोखून धरण्यात आली आहे.
गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक पलटी होऊन आग लागल्याची घटना मनमाडमध्ये घडली pic.twitter.com/PvjitLJyT1
— News18Lokmat (@News18lokmat) October 8, 2022
ट्रकमध्ये गॅसने भरलेले सुमारे 200 सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर एकापाठोपाठ काही सिलेंडर आकाशामध्ये उडाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे इथं जाण्यास अडचण येत आहे. अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (धक्कादायक! नाशिकमध्ये जळालेल्या बसमध्ये काका पुतण्यांचा पत्ता नाही, सोबत लाखो रुपये जळाले) दरम्यान, आज दुपारी नाशिकच्या वणी गडावर ही घटना घडली. नांदुरीहुन वनी गडावर ही बस येत होती. गडाकडे येत असताना अचानक बसला आग लागली. धावत्या बसने पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली. बसमधील सर्व प्रवाशांनी लगेच बसमधून खाली उड्या टाकल्या. त्यामुळे बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले आहे. स्थानिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. खासगी ट्रॅव्हल्सच्या बस अपघातात मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत आज पहाटे खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. आरटीओ आणि पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. बसमध्ये ओव्हरलोड प्रवासी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रवासी बस ट्रकचा डिझेल टँकरवर आदळल्याने स्फोट होऊन बसला आग लागण्याची माहिती समोर आली आहे. नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. ( आगीत जळालेल्या प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला; नाशकातील बस दुर्घटनेचे थरकाप उडवणारे Photos ) या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथील अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.