मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धक्कादायक! नाशिकमध्ये जळालेल्या बसमध्ये काका पुतण्यांचा पत्ता नाही, सोबत लाखो रुपये जळाले

धक्कादायक! नाशिकमध्ये जळालेल्या बसमध्ये काका पुतण्यांचा पत्ता नाही, सोबत लाखो रुपये जळाले

वाशिम जिल्ह्यातील काही प्रवाशांनी अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या केबिनमधून प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वाशिम जिल्ह्यातील काही प्रवाशांनी अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या केबिनमधून प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वाशिम जिल्ह्यातील काही प्रवाशांनी अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या केबिनमधून प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

किशोर गोमाशे, वाशिम,08 ऑक्टोंबर : वाशिम जिल्ह्यातील काही प्रवाशांनी अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या केबिनमधून प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये मालेगांव तालुक्यातील तरोडी येथील उद्धव पंढरी भिलंग (वय 45 ) व वैभव वामन भिलंग (वय 22) हे दोघे केनवड परिसरातून नाशिकला जाण्यासाठी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या गाडीत बसले होते. यातील उद्धव भिलंग यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर वैभव भिलंग या युवकाचा कोणताही पत्ता लागत नाही.

तसेच वाशिम मधून साहिल जितेंद्र चंद्रशेखर (वय 16) हा मुलगा याच गाडीमध्ये चालकाच्या बाजूला केबिनमध्ये बसला होता. त्याला त्याची बहीण नेहा चंद्रशेखरने गाडीत बसवले तेव्हा केबिनमध्ये अनेज जण बसल्याचं नेहा चंद्रशेखर हीने NEWS18 लोकमतला सांगितलं. या अपघातानंतर साहिल चंद्रशेखरचा कोणताही संपर्क होत नसल्यानं कुटुंबीय चिंतातुर आहेत.

हे ही वाचा : नाशिकमध्ये आणखी एका बसला आग, वणी गडावर धावत्या ST बसने घेतला पेट

यातील मृतक उद्धव भिलंग व वैभव भिलंग हे दोघे नात्याने काका पुतण्या असून गाडीचा व्यवहार करण्यासाठी नाशिकला जात होते. त्यांच्या समवेत 2 लाखांची रोकड सुद्धा होती. उद्धव भिलंग यांच्या समवेत रक्कम ही जळाल्याची समजते आहे.

असा झाला अपघात

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर खासगी बसला आग लागल्यामुळे 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  ज्यावेळी या बसचा अपघात झाला, तेव्हा बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे समोर आले आहे. ही बस भरधाव वेगात डिझेल टँकरला धडकली, त्यामुळे आग लागली.नाशिक -औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे सव्वा पाच वाजता झालेल्या भीषण अपघातात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. या अपघातात बस मधील जवळपास १० प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

नाशिक बस अपघातातील मृतांचा वारसांना 5 लाखांची मदत

दरम्यान, नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

हे ही वाचा :आगीत जळालेल्या प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला; नाशकातील बस दुर्घटनेचे थरकाप उडवणारे Photos

या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथील अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

First published:

Tags: Burning car, Nashik