मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रचंड गर्दीचा दिवस, पुणे-नाशिक अन् मंचर-भीमाशंकर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; 10 KM पर्यंत वाहनांच्या रांगा

प्रचंड गर्दीचा दिवस, पुणे-नाशिक अन् मंचर-भीमाशंकर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; 10 KM पर्यंत वाहनांच्या रांगा

प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांवरही भाविकांची मोठीच्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांवरही भाविकांची मोठीच्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांवरही भाविकांची मोठीच्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

पुणे, 13 ऑगस्ट : सलग सुट्ट्या आणि श्रावण मास यात्रा सुरू असल्याने पुणे-नाशिक महामार्ग व भीमाशंकर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने ठिकठिकाणी 5 ते 10 किलोमीटरपर्यत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांसह पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या भीमाशंकर आणि जुन्नर परिसरात पर्यटनस्थळावर मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक पाहायला मिळत आहे. परिणामी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. परिणामी महामार्गावर वाहतूक पोलिसांवर ताण आला आहे. तर दुसरीकडे भीमाशंकर परिसरात गर्दी वाढत असल्याने भाविकांसाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र गर्दीचा लोट मोठ्या प्रमाणात असल्याने भाविक आणि पोलिसांमध्येही वाद होत आहेत. 14, 15, 16 सलग सुट्ट्या आल्या कारणाने अनेकांनी फिरण्याचा प्लान केला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. केवळ महामार्गावरच नाही तर ट्रेनमध्येही गर्दी पाहायला मिळत आहे. त्याशिवाय पर्यटन ठिकाणीही मोठा ताण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गर्दीत बाहेर न जाता घरीच एन्जॉय करता येईल Long Weekend, 10 टिप्स करा फॉलो मोठा वीकएंड (Long Weekend) आला की अनेकांचं सुट्ट्यांचं प्लॅनिंग सुरू होतं. कुठे तरी बाहेर जाऊन एन्जॉय करणं अनेकांना आवडतं; पण पर्यटनस्थळांवर गर्दी तर होतेच आणि प्रचंड ट्रॅफिकही होतं. मग बराचसा वेळ ट्रॅफिक जाममध्येच जातो आणि आपली चिडचिड होते. घराबाहेर न पडताही लाँग वीकएंड किंवा सुट्टी एन्जॉय करता येते. यामुळे बाहेरच्या गर्दीत जावं लागणार नाही आणि तुमची सुट्टीही चांगली जाईल आणि पुन्हा आठवड्याभराच्या कामासाठी रिफ्रेश व्हाल.
First published:

Tags: Nashik, Pune, Traffic

पुढील बातम्या