मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

गर्दीत बाहेर न जाता घरीच एन्जॉय करता येईल Long Weekend, 10 टिप्स करा फॉलो

गर्दीत बाहेर न जाता घरीच एन्जॉय करता येईल Long Weekend, 10 टिप्स करा फॉलो

घराबाहेर न पडताही लाँग वीकएंड (Long weekend) किंवा सुट्टी एन्जॉय करता येते. त्यासाठी 10 टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

घराबाहेर न पडताही लाँग वीकएंड (Long weekend) किंवा सुट्टी एन्जॉय करता येते. त्यासाठी 10 टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

घराबाहेर न पडताही लाँग वीकएंड (Long weekend) किंवा सुट्टी एन्जॉय करता येते. त्यासाठी 10 टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

    मुंबई, 13 ऑगस्ट : मोठा वीकएंड (Long Weekend) आला की अनेकांचं सुट्ट्यांचं प्लॅनिंग सुरू होतं. कुठे तरी बाहेर जाऊन एन्जॉय करणं अनेकांना आवडतं; पण पर्यटनस्थळांवर गर्दी तर होतेच आणि प्रचंड ट्रॅफिकही होतं. मग बराचसा वेळ ट्रॅफिक जाममध्येच जातो आणि आपली चिडचिड होते. घराबाहेर न पडताही लाँग वीकएंड किंवा सुट्टी एन्जॉय करता येते. यामुळे बाहेरच्या गर्दीत जावं लागणार नाही आणि तुमची सुट्टीही चांगली जाईल आणि पुन्हा आठवड्याभराच्या कामासाठी रिफ्रेश व्हाल. अशा मोठ्या सुट्टीत घरी काय काय करता येऊ शकतं, यावर एक नजर टाकू या. 'Vaya' या वेबसाइटने याबद्दल माहिती दिली आहे. 1. कुटुंबाबरोबर क्वालिटी टाइम घालवा तुमच्या मुलांसाठी आठवडाभर तुम्हाला वेळ देता येत नसेल; पण वीकएंडला तुम्ही त्यांच्याबरोबर धमाल पार्टी करा. जुने फोटो अल्बम काढा, जुन्या आठवणींना उजाळा द्या. तुमच्या आईकडून नवनवीन पदार्थ शिका. वडिलांना बागकामात मदत करा. भावंडांबरोबर गेम्स खेळा. रात्री छानसं फॅमिली डिनर घ्या. रात्रीच्या जेवणासह तुम्ही घरच्यांशी छान गप्पा मारू शकता. 2. तुमच्या आवडीचा स्वयंपाक करा सुट्टीच्या दिवशी आवडीच्या पदार्थाची गरमागरम डिश तुमच्या हातात असेल तर मग सुट्टीची मजा काही औरच. अगदी सोप्या ब्रेकफास्ट रेसिपी शोधा. एखाद्या दिवशी भरपूर ब्रंच (Cooking) करा आणि रविवारी रात्री मस्त डिनर करून तुमच्या वीकएंडची छानपैकी सांगता करा. राजमा चावल, बिर्याणी किंवा गरमागरम इडली आणि त्यासोबत नारळाची मस्त चटणी असे अगदी भारतीय पदार्थ करू शकता. ब्रंचसाठी शाक्शुका, ग्रिल्ड चिकन, चीज सँडविचेस आणि शेवटी वॉलनट ब्राउनी असं काही केलंत तर मजा येईल. 3. OTT आणि Chill आठवडाभर कामाच्या धामधुमीत तुम्हाला तुमच्या आवडत्या वेबसीरिज किंवा चित्रपट पाहता येत नसतील तर या लाँग वीकएंडचा नक्की फायदा घ्या. मित्रमैत्रिणींना घरी बोलवा आणि दिवसभर ओटीटीवरील वेबसीरिज (binge marathon) एन्जॉय करा. सोबत कुकीज, चिप्स यांसारख्या पदार्थांच्या भरलेल्या बरण्या ठेवा आणि मस्त रिलॅक्स व्हा. रात्री तुमचा आ आवडता चित्रपट पाहा... तुमचा वीकएंड नक्कीच मस्त जाईल. लाँग वीकेंड ट्रिपचा प्लॅन केलाय; प्रवासाआधी एकदा राशिभविष्य जरूर वाचा 4. गेम नाइट आठवडाभर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर धमाल  करण्याची वाट बघत असाल तर ही एक मस्त आयडिया आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना गेम नाइटसाठी (Game night) घरी बोलवा. त्यांच्याबरोबर Charades, बोर्ड गेम्स, मोनोपोली किंवा उनो खेळून मस्त गप्पा मारा. भरपूर कुकीज करून ठेवा. वीकएंडला तुमच्या आवडत्या खेळाची मॅच असेल तर मग मित्रांच्या गँगसोबत आवडता खेळ पाहा. 5. आवडतं पुस्तक वाचा तुम्हाला वाचायची खूप आवड असेल आणि एरव्ही वाचनासाठी (Reading) वेळ मिळत नसेल तर लाँग वीकएंडचा फायदा घ्या. अनेक दिवस तुम्हाला वाचायचं असलेलं पुस्तक वाचा. मस्त आवडतं पांघरूण, मऊ उशा, छानसा प्रकाश आणि जोडीला तुमचं आवडतं पुस्तक असेल तर वीकएंड संस्मरणीय ठरेल. 6. घरी स्पा / व्यायाम करा आठवडाभर कामामुळे दगदग होतेच. लाँग वीकएंडला बाहेर जाऊन आणखी थकण्यापेक्षा घरीच राहून तुम्ही तुमचे लाड (Pamper yourself ) करून घेऊ शकता. मस्त नेल आर्ट, मॅनिक्युअर- पॅडिक्युअर करून घ्या, केसांना हायलाइट करा किंवा एखादा छानसा मसाज करून घ्या. मैत्रिणींना घरी बोलवा आणि मजा करा. तुम्हाला व्यायामाची खूप आवड असेल तर वीकएंडला जिममध्ये जाण्याऐवजी घरीच राहून व्यायाम करा. व्यायामामुळे फक्त शरीरालाच नाही तर मनालाही प्रसन्न वाटेल. संपूर्ण आठवडाभर काम करण्यासाठी तुम्हाला एनर्जी मिळेल. वजन कमी करायचंय? रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पेय प्या, होईल मोठा फायदा 7. तुमच्या छंदासाठी वेळ द्या तुम्हाला संगीत ऐकायला आवडतं? काही जणांना लिहायची आवड असेल किंवा तुम्ही छान पेंटिंग करत असाल. कामाच्या रगाड्यात तुम्हाला तुमच्या छंदासाठी वेळच मिळत नसेल तर या लाँग वीकएंडचा फायदा घ्या आणि तुमच्या आवडत्या छंदासाठी (Hobby) आवर्जून वेळ द्या. तुमच्याकडे बाग असेल तर गार्डनिंगसाठी वेळ देऊ शकता. 8. बागकाम बागकाम (Gardening) करणं हा अनेकांचा छंद असतो. तुमचं छोटंसं व्हेजिटेबल गार्डन तयार करून तुमच्या कुटुंबाला रसायनमुक्त आणि ताजी फळं-भाज्या तुम्ही खायला घालू शकता. वीकएंडला रिलॅक्स होण्यासाठी बागकाम हा एक उत्तम पर्याय आहे यात शंका नाही. यामुळे तुम्ही खरोखरच फ्रेश व्हाल. 9. तुमचं घर सजवा तुम्ही नवीन घरात शिफ्ट झाला असाल आणि तुम्हाला रोजच्या धकाधकीत घर सजावटीसाठी अजिबात वेळ मिळाला नसेल, तर वीकएंडचा फायदा करून घ्या. वीकएंडला तुमचं नवीन घर सजवा (Decorate your home) किंवा जुन्या घराचा मेकओव्हर करा. घरातली धूळ, जळमटं काढा, घर स्वच्छ करा. एखादं नवीन फर्निचर किंवा लँप शेड आणून तुमचं घरं आणखी सुंदर करा. 10. क्रिएटिव्ह व्हा वीकएंडमध्ये तुमच्या सर्जनशीलतेला चालना द्या. घरात एखादी कुंडी रंगवा, टाकाऊ वस्तूंपासून काही तरी नवीन तयार करा, शिवणकाम करा किंवा पेंटिंग करा. असं केल्यानं नक्कीच काही तरी चांगलं केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. तुम्ही वीकएंड कसा घालवता यावर तुमचा संपूर्ण आठवडा कसा जाईल हे अवलंबून असतं. वीकएंडला रिलॅक्स झालात तर कामात अधिक चांगलं लक्ष लागतं. त्यासाठी आम्ही सांगितलेल्या या 10 गोष्टींपैकी एखादी गोष्ट करा, फरक नक्की जाणवेल.
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या