नाशिक 08 डिसेंबर : नाशिक शहरात पार्किंगच्या नावाने बोंबाबोंब असताना वाहतूक विभाग मात्र वाहन टोईंगची कारवाई करत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. टोईंग विरोधात नाशिककरांनी अनेक आवाज उठवून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्या, म्हणून निवेदन दिली आहेत. परंतु प्रशासन याकडे कानाडोळा करत वाहनांवर कारवाई करत आहे. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था करून द्यावी म्हणून नागरिक प्रशासनाकडे मागणी करत आहेत.
पार्किंगची व्यवस्था नसताना या ठिकाणी कारवाई
मेनरोड हा परिसर पूर्णतः रहदारीचा परिसर आहे. येथे बाजारपेठेत दररोज हजारो नागरिक येत असतात मात्र त्यांना वाहन पार्क करण्यासाठी जागा नाही आहे. महानगरपालिकेने पार्किंगची व्यवस्थाच केलेली नाही आहे. त्यामुळे वाहन चालक रस्त्याच्या कडेला इकडे तिकडे आजूबाजूला गाडी पार्क करून बाजारात जातात. मात्र वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून त्या वाहनावर कारवाई केली जात आहे.
Nashik : पुस्तक खरेदीवर मिळेल 50 टक्के सूट, पाहा कुठं आहे ही ऑफर? Video
सीबीएस परिसर
या परिसरात दोन मुख्य बसस्थानक आहेत. त्यामुळे दररोज अनेक प्रवासी येत असतात. इतर ही नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असते. परंतु महानगरपालिकेने या ठिकाणी देखील पार्किंगची व्यवस्था केलेली नाही आहे. येथे ही रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांवर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जात आहे.
शालिमार बाजारपेठ
नाशिक शहरातील सर्वात मोठी कपड्यांची बाजारपेठ आहे. वाहनांची वर्दळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते. मात्र येणाऱ्या वाहन चालकांना पार्किंग साठी येथे जागाच नाही. वाहन चालक बाजारपेठेच्या आजूबाजूला वाहन पार्क करतात. मात्र काही वेळातच या ठिकाणी वाहतूक विभाग येऊन कारवाई करत आहे.
भद्रकाली परिसर
सकाळी आणि सायंकाळी या भागात अधिक वाहनांची ये-जा असते. इतर ही अनेक दुकानं या परिसरात आहेत. येथे देखील वाहनांना पार्किंगसाठी जागा महानगरपालिकेने दिलेली नाही आहे. त्यामुळे वाहन कुठे पार्क करायची असा प्रश्न वाहन धारकांसमोर समोर असतो. वाहन चालक ही नाईलाजस्तव वाहन जिथे जागा मिळेल तिथे पार्क करतात आणि नंतर वाहतूक विभाग कारवाई करतो. यामुळे वाहन चालकांचा संताप होतो.
मुजोर रिक्षाचालकांपासून कधी सुटका होणार? पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नाशिककर त्रस्त
पार्किंगची व्यवस्था करा नंतरच वाहन टोइंग करा
स्मार्ट शहर म्हणून नाशिक शहराची ओळख होवू पाहत आहे. मात्र, शहरात वाहन पार्किंगच्या नावाने शंकोबा आहे. वाहन पार्क कुठे करावं असा प्रश्न पडतो. नाईलाजास्तव जिथे जागा मिळेल तिथे नागरिक वाहन पार्किंग करतात आणि त्यानंतर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. विशेष म्हणजे वाहतूक विभागाने टोईंगचा ठेका दिला आहे. त्यातील कर्मचारी अनेक वेळा नागरिकांना अरेरावीची भाषा वापरतात. तरीही वाहतूक विभाग त्यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नाही. पार्किंगची जागा उपलब्ध करून द्या त्यानंतरच जे वाहन चालक नियम तोडतील त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा नाशिककरांना या विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक सचिन आव्हाड यांनी दिली आहे.
अनधिकृत जागेवर वाहन पार्किंग केल्यास कारवाई
गेल्या नोव्हेंबर महिन्यात जवळपास नाशिक शहरात 1481 वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यातील दुचाकी - 737 वाहन आहेत. तर 744 चारचाकी वाहन आहेत. एकूण दंड 7 लाख 59 हजार 500 रुपये जमा करण्यात आला आहे. अनधिकृत जागेवर वाहन पार्किंग केल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती नाशिक शहर वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.