जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik : पुस्तक खरेदीवर मिळेल 50 टक्के सूट, पाहा कुठं आहे ही ऑफर? Video

Nashik : पुस्तक खरेदीवर मिळेल 50 टक्के सूट, पाहा कुठं आहे ही ऑफर? Video

Nashik : पुस्तक खरेदीवर मिळेल 50 टक्के सूट, पाहा कुठं आहे ही ऑफर? Video

नाशिक मध्ये ग्रंथजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाचकांसाठी 50 टक्के सवलत देऊन पुस्तकांची विक्री केली जात आहे.

  • -MIN READ Local18 Nashik,Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    नाशिक, 03 डिसेंबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळावी यासाठी ज्योती स्टोअर्सच्या वतीने नाशिक मधील सार्वजनिक वाचनालयामध्ये ग्रंथजत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाचकांसाठी 50 टक्के सवलत देऊन पुस्तकांची विक्री केली जात आहे. त्यामुळे वाचकांसाठी पुस्तकांची खरेदी करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. 31 डिसेंबर पर्यंत ही ग्रंथजत्रा सुरू राहणार आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेतील विविध पुस्तकं या ग्रंथजत्रेत उपलब्ध आहेत. या ग्रंथजत्रेत लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत हवं ते पुस्तक मिळेल. सर्वच प्रकारच्या पुस्तकांचा यात समावेश आहे. वाचन संस्कृतीला बळ देऊन,प्रचार प्रसार व्हावा अधिक लोकांपर्यंत पुस्तकं जावीत हा आमचा विचार आहे. दरवर्षी आम्ही नाशिककरांसाठी ग्रंथजत्रेचे आयोजन करत असतो आणि त्याला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत असतो. पुस्तक वाचन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. हल्ली पुस्तक वाचणं   हे कमी होत चालल आहे. अनेक जण मोबाईल किंवा इतर माध्यमातून माहिती मिळवत असतात. मात्र पुस्तकं ही खूप महत्वाची आहेत. महत्वाचा पुरावा आपल्याला पुस्तकांमध्ये मिळत असतो, अशी प्रतिक्रिया आयोजक वसंत खैरनार यांनी दिली आहे.

    365 दिवस आणि 12 तास भरते ‘ही’ शाळा! मुलांना हजारपर्यंतचे पाढेही पाठ, Video

    या पुस्तकांचा आहे समावेश मृत्युंजय, बटाट्याची चाळ, छावा, पानिपत, पार्टनर, श्यामची आई, राजा शिवछत्रपती, अमृतवेल, संभाजी, अग्निपंख, महानायक, सखी, माझी जन्मठेप, बाळाची नाती, फिंद्री, मी आपला उगीचच, माती, सावित्री, सुविचार, सांज किरणे, जागृती, दिंडी निघणार आहे, विचार धन, लोकरंग नाट्यरंग, ज्ञानज्योती, अस्वस्थ कल्लोळ, अवर्त, भारतीय शासन राजकारण, एका गावाची गुलाबी गोष्ट, दारणाकाठच्या पाऊलखुणा, मातीची मुळाक्षरे, चंद्रकोर, तिमिर मौन, माझ्या मनाच्या अंतरी, मुगधायनी, हुंदका, कविता अंतरीच्या, शोषण बोलगाणी, शाळा, कोसला, काजळ माया, झोंबी, बनगरवाडी, ज्ञानेश्वरी, फकिरा, असे विविध पुस्तकं या ग्रंथजत्रेत आहेत.

    गुगल मॅपवरून साभार

    कुठे आहे ही ग्रंथजत्रा सुरू नाशिक शहरातील शालिमार बाजारपेठे लगत असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या पुढच्या हॉल मध्ये ही ग्रंथजत्रा आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक - 9422257117

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , nashik
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात