जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik : आदिवासी पदार्थ, गाणी आणि बऱ्याच काही गोष्टींचा घ्या एकत्र अनुभव, पाहा Video

Nashik : आदिवासी पदार्थ, गाणी आणि बऱ्याच काही गोष्टींचा घ्या एकत्र अनुभव, पाहा Video

Nashik : आदिवासी पदार्थ, गाणी आणि बऱ्याच काही गोष्टींचा घ्या एकत्र अनुभव, पाहा Video

राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे.

  • -MIN READ Nashik,Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    नाशिक 16 नोव्हेंबर : राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. विविधतेने नटलेल्या आदिवासी संस्कृती,परंपरा यांचे दर्शन होण्यासाठी तसेच आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हा महोत्सव महत्वाचा ठरणार आहे. 18 नोव्हेंबर पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या राज्यस्तरीय आदिवासी महोत्सवाचे उद्घाटन (15 नोव्हेंबर) पार पडले आहे. विशेष म्हणजे आदिवासी बांधवांमध्ये विविध कौशल्य, कला,गुण असतात. मात्र त्यांना चांगल मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे त्यांची कला,समाजासमोर येत नाही. त्यामुळेच भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी विकास विभागाने हा महोत्सव आयोजित केला आहे.

    Nashik : पोलीस होण्यासाठी मिळणार मोफत मदत, लगेच करा ‘हे’ काम

    आदिवासी बांधवांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल आदीवासी बांधव आपली संस्कृती परंपरा जपत पर्यावरण पूरक विविध वस्तू तयार करतात. मात्र, त्यांना त्यांच्या मालाची विक्री कशी करायची याची बहुधा माहिती नसते आणि यामुळे त्यांनी केलेल्या उत्पादित वस्तूंना चांगला भाव मिळत नाही. त्यांना दोन पैसे नफा होत नाही आणि हाच उद्देश समोर ठेऊन या राज्यस्तरीय आदिवासी महोत्सवात आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये राज्यभरातून अनेक जण सहभागी झाले आहेत. प्रत्येकाने आपल्या कलेतून कौशल्य पूर्ण तयार केलेल्या वस्तू या ठिकाणी विक्रीसाठी आणल्या आहेत. ज्या वस्तूं आपल्याला कधी ही बाजारात बघायला मिळत नाही. त्या ही अगदी कमी किंमतीत या ठिकाणी मिळत आहेत. त्यामध्ये लाकडापासून, कागदापासून, विविध झाडांपासून, वनस्पतींपासून, रेशीम पासून, आयुर्वेदिक औषध, अशा अनेक वस्तूंचे प्रदर्शन या ठिकाणी आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी येऊन आम्ही तयार केलेल्या वस्तू खरेदी कराव्यात अशी प्रतिक्रिया दीपश्री पावरा यांनी दिली आहे.

    Pune : राज्यातील पहिली दही भेळ ‘इथं’ सुरू झाली! आजही आहे सुपरहिट, पाहा Video

    आदिवासींचे परंपरागत खाद्य पदार्थ आपण बाजारातून जे पदार्थ आणतो,त्यामध्ये अनेक वेळा आपल्याला विविध प्रकारची भेसळ दिसून येते,जी आपल्या आरोग्याला हानिकारक असते. मात्र आदिवासी बांधवांनी येथे जंगलातील अनेक प्रकारच्या भाज्या,वनस्पती,विक्रीसाठी ठेवल्या आहेत. काही पदार्थ तयार केलेले देखील विक्रीसाठी आहेत. भाकरी भाजी, चटणी,अशा अनेक प्रकारच्या पदार्थांची चव चाखायला या ठिकाणी मिळत आहे. अनेक खवय्ये देखील या महोत्सवात सहभागी होत आहेत. आदिवासी संस्कृती जपलेल्या गाण्यांच्या स्पर्धा आपल्या देशाची,राज्याची,भागाची खरी संस्कृती ही आदिवासी बांधवांनी जपली आहे आणि त्यांच्यामुळे ती जिवंत देखील आहे. कारण कुठेतरी आधुनिकतेच्या नावाखाली संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. या महोत्सवात राज्यभरातून आलेल्या आदिवासी बांधवांच्या गाण्यांच्या स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यात आदिवासी बांधव आपली कला सादर करत आहेत.

    Aurangabad : लग्नसराईची खरेदी सुरू, पाहा कोणत्या दागिन्याची आहे क्रेझ, Video

    अशा महोत्सवामुळे आदिवासी बांधवांना उत्साह मिळेल नाशिकमध्ये हा जो महोत्सव आयोजित केला आहे. हा अतिशय सुंदर आहे. पहिल्यांदाच कुठे तरी आदिवासी बांधवांच्या इतक्या मोठ्या कलागुणांचे दर्शन होत आहे. त्यांनी बनवलेल्या वस्तू,जपलेली संस्कृती, परंपरा ही वाखण्याजोगी आहे. राज्य सरकारने जास्तीत जास्त प्रमाणात असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे,जेणेकरून आदिवासी बांधव आपल्या वस्तूंची या माध्यमातून विक्री करतील त्यांना त्याच ज्ञान मिळेल. त्यांना अजून काम करण्याची ऊर्जा मिळेल,खूप छान महोत्सव या ठिकाणी सुरू आहे. प्रत्येकाने या ठिकाणी भेट द्यावी अशी प्रतिक्रिया प्रसाद सानप यांनी दिली आहे.

    गुगल मॅपवरून साभार

    कुठे सुरू आहे हा आदिवासी महोत्सव नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदान येथे आदिवासी  महोत्सव  सुरू आहे. सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , nashik
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात