नाशिक, 15 नोव्हेंबर : राज्यात पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने दोन दिवसीय मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर आयोजित केले गेले आहे. नाशिकच्या के.टी.एच.एम महाविद्यालय गंगापूर रोड येथे 19 आणि 20 नोव्हेंबरला हे मार्गदर्शन शिबिर पार पडणार आहे. पोलीस भरती प्रक्रियेचा पूर्ण सराव या ठिकाणी करून घेतला जाणार आहे. शिबिरात प्रशिक्षणार्थींना या बाबींचे मार्गदर्शन पोलीस भरतीचा प्रथमतः फॉर्म कसा भरायचा,फॉर्म भरताना काय काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर पोलीस भरतीत शारीरिक चाचणी खूप महत्वाची असते. त्यात रनिंग,गोळा फेक, भाला फेक, याचा सराव कसा करायचा. त्यामध्ये आवश्यक गुण किती हवे असतात. तसेच या दरम्यान आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची,आहार कसा असला पाहिजे. त्याची देखील या शिबिरात बारकाईने माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर पोलीस भरतीत महत्वाचा पार्ट असतो तो लेखी परीक्षा यावर सखोल मार्गदर्शन केलं जाणार आहे. लेखी परीक्षा कशी असते. त्यात कोणते प्रश्न अधिक विचारले जातात. अभ्यास कसा केला पाहिजे,कोणती पुस्तकं अधिक वाचली पाहिजे,परिक्षेत कशाला अधिक महत्व दिलं गेलं पाहिजे, किती गुण अपेक्षित असतात. तसेच विद्यार्थ्यांचा सराव म्हणून लेखी परीक्षा घेतली जाईल. आहारतज्ज्ञ तसेच मानसतज्ज्ञ यांचे ही मार्गदर्शन मिळेल.
Nashik : मूकबधीर जोडप्याचा पाणीपुरी स्टॉल, नाशिककरांचा बनला प्रेरणास्थान! Video
परीक्षा काळात आपली मानसिकता कशी असली पाहिजे आपण काय काळजी घेतली पाहिजे याची सविस्तर माहिती दिली जाईल. या पोलीस भरती प्रशिक्षण शिबिरात प्रसिद्ध लेखक आणि तज्ज्ञ बाळासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची प्रतिक्रिया ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच आयोजक अजय बोरस्ते यांनी दिली आहे.
गुगल मॅपवरून साभार
कधी आणि कुठे होणार हे पोलीस मार्गदर्शन शिबिर दिनांक 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी के.टी.एच.एम कॉलेज गंगापूररोड येथे होणार आहे.
Nashik : वृद्धांची काळजी घेणारे पती-पत्नी, आई-वडिलांसारखा करतात निराधारांचा सांभाळ, Video
ऑनलाईन नोंदणी खालील दिलेल्या लिंक वर करा https://forms.gle/vMdWxPnk4o9f1znc8 या लिंक द्वारे तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता. ऑफलाईन नोंदणी इथे करा अश्वमेध करियर अकादमीमुरकुटे लेण नं 1,पंडित कॉलनी गंगापूर रोड,येथे ऑफलाईन फॉर्म भरू शकतात. अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करा. संपर्क क्रमांक - 8806791777