औरंगाबाद, 16 नोव्हेंबर : तुळशी विवाह पाठोपाठ लग्नसराईला सुरुवात झाली आहे. लग्नसराई म्हटलं तर धूमधाम असते. यामध्ये कपडे, खाद्यपदार्थांसह दागिने खरेदी वरती विशेष लक्ष दिलं जातं. लग्न मंडपात वधू-वरांसाठी त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी दागिने हे विशेष महत्त्वाचे असतात. यामुळे लग्नसराईत दागिन्यांना विशेष महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरामध्ये बाजारपेठेत कोणत्या प्रकारच्या दागिन्याची क्रेझ पाहिला मिळत आहे जाणून घेऊया. लग्नसराईला सुरुवात झाली असल्यामुळे औरंगाबाद शहरामध्ये वधू-वर मंडळींच्या घरामध्ये दागिने खरेदी करण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामासाठी बाजारपेठेत मंगळसूत्रामध्ये वाटी मंगळसूत्राची क्रेझ आहे. यामध्ये तब्बल 50 हून अधिक प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत. तर फॅन्सी मंगळसूत्रांमध्ये जानवी टाईप, सिंगल वाटी, रोडियम इत्यादी प्रकारांची क्रेझ आहे.
हिवाळ्यात खा आमरस, औरंगाबादमध्ये नोव्हेंबर महिन्यात मिळतोय आंबा! Video
ट्रेडींग वाटी मध्ये असलेले प्रकार फुटबॉल वाटी, सी कट वाटी, डमरू वाटी, राजकोट वाटी, बंगाली वाटी तर फॅन्सी वाटी, श्रीदेवी वाटी, स्पॉट वाटी, पैलू वाटी, डायमंड वाटी, मीना वाटी, शिंपला वाटी इत्यादी प्रकार बाजारपेठेत उपलब्ध आहेत. फॅन्सी मंगळसूत्र जानवी टाईप, सिंगल वाटी, रोडीयम, नॅनो टाईप, शॉर्ट फॅन्सी, तिरंगा, सिंगल चैन, डबल चैन, सिंगल मनी, डायमंड , डबल नेम, लेटर वाल, टेम्पल, आरबी डिझाईन, ब्लॅक बिट्स, जळगाव पॅटर्न, बॉम्बे फॅन्सी इत्यादी प्रकारचे मंगळसूत्र उपलब्ध आहेत.
Aurangabad : अवैध होर्डिंग लावणाऱ्यांना अखेरचा इशारा, वेळीच सुधारा नाहीतर…! Video
बाजारपेठेतमध्ये विविध प्रकारचे दागिने उपलब्ध झाले आहेत. यंदा लग्नसराई मध्ये ग्राहकांसाठी सुंदर दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. मंगळसूत्रामध्ये सध्या वाटी प्रकाराचा ट्रेंड आहे. यामध्ये 50 हून अधिक प्रकारचे डिझाईन असल्यामुळे ग्राहकांना हवं ते खरेदी करता येऊ शकतं, असं महावीर ज्वेलर्स व्यवस्थापक शुभम भाटी यांनी सांगितलं.