पुणे, 16 नोव्हेंबर : तुम्ही आत्तापर्यंत मटकी भेळ, चिवडा भेळ, सुकी भेळ, ओली भेळ असे भेळीचे वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील. हे प्रकार राज्यात सगळीकडं मिळत असल्यानं सर्वांना चांगलेच माहिती आहेत. पण, तुम्ही दही भेळ हा प्रकार कधी खाल्लाय का? अगदी कमी ठिकाणी हा प्रकार मिळतो. राज्यात पहिल्यांदाच दही भेळ
पुण्यात
सुरू झाली. ही भेळ अगदी कमी कालावधीमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या भेळीचं वैशिष्ट्य काय आहे? हे आपण पाहूया कशी असते दही भेळ? पुण्यातील सुदामा भेळनं हा प्रकार राज्यात पहिल्यांदा सुरू केला असा दावा या भेळचे मालक इश्वर पेर्ला यांनी केला आहे. यामध्ये भेळीचे चुरमुरे, फरसाण, मुरमुरे यासोबत सुदामा स्पेशल चटणी आणि ताजे दही यांचा समावेश असतो. दही आणि चटणीमुळे ही भेळ मऊ होऊ शकते, त्यामुळे ती पटकन खाणे आवश्यक आहे. दह्याच्या गोडव्यासोबतच भेळीचा क्रिस्पीपणा, फरसाण आणि चटणीचा तिखट-आंबट-गोडपणा या भेळमध्ये असतो. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही भेळ आवडते, असं पेर्ला यांनी सांगितले.
ब्लूमिंग ऑनियन! कांदा भजीला पर्याय असलेली कोल्हापुरी डिश तुम्ही खाल्लीय? पाहा Video
सुशांत कटके हे पुणेकर गेल्या 11 वर्षांपासून इथं नियमित दही भेळ खाण्यासाठी येतात. ‘मी दहीभेळ आवर्जून खातो. ही चवीला चांगली आहेच त्याचबरोबर नेहमीच्या भेळपेक्षा वेगळी आहे,’ असे त्यांनी सांगितले.
गुगल मॅपवरून साभार
कधी खाणार दही भेळ? सकाळी 10 ते रात्री 11:00 वाजेपर्यंत सुदामा भेळ ग्राहकांसाठी सुरू असते. पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात असलेल्या सुदामा भेळच्या आऊटलेटमध्ये ही भेळ उपलब्ध आहे.