जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना रुळावरच बंद पडली ST बस; इतक्यात ट्रेन येण्याची वेळ झाली अन्.., नाशकातील थरार

रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना रुळावरच बंद पडली ST बस; इतक्यात ट्रेन येण्याची वेळ झाली अन्.., नाशकातील थरार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

लासलगाव येथून प्रवाशांना घेऊन मनमाडला जात असलेल्या बसमध्ये काहीतरी बिघाड झाला. हा बिघाड रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वे गेटच्या मधोमध रुळावर झाला आणि बस तिथेच बंद पडली.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक 28 ऑगस्ट : ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ ही म्हण तुम्ही आजवर अनेकदा ऐकली असेल. मात्र, बऱ्याचदा या म्हणीचा प्रत्यय देणाऱ्या अनेक घटना आपल्याला प्रत्यक्षात पाहायलाही मिळतात. अशीच एक घटना नुकतीच नाशिकमध्ये घडली. लासलगाव-मनमाड एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मृत्यूच्या दारातून परत आल्याचा अनुभव आला दोघींचं भांडण पण फायदा मात्र त्याचा! बॉयफ्रेंड कोणाचा यावर भांडत राहिल्या 2 गर्लफ्रेंड, पुढे जे घडलं ते… लासलगाव येथून प्रवाशांना घेऊन मनमाडला जात असलेल्या बसमध्ये काहीतरी बिघाड झाला. हा बिघाड रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वे गेटच्या मधोमध रुळावर झाला आणि बस तिथेच बंद पडली. चालकाने बस सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र ती सुरू झाली नाही. एकीकडे रुळावर अडकलेली एसटी तर दुसरीकडे रेल्वे गाड्यांची येण्याची झालेली वेळ यामुळे चालक, वाहक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. सर्वांनी मिळून एसटी रुळावरून हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र बिघाड असा झाला होता की बस इंचभर देखील जागेवर सरकत नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी एसटीमधून उतरणंच पसंत केलं. एसटी जागेवरून हालतच नसल्याचं पाहून अखेर मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्या. नाशकात दारू पिऊन बसमध्ये बसली महिला; तर्राट होऊन धिंगाणा, पोलिसांनाही आवरेना, शेवटी.. गाड्या थांबवून मॅकनिकलाच याठिकाणी बोलवण्यात आलं. मॅकनिकला बोलावल्यानंतर झालेला बिघाड दूर करण्यात आला.यानंतर एसटी गेटच्या रुळावरून हटवण्यात आली आणि रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, या घटनेमुळे काही काळ सगळ्यांचीच तारांबळ उडाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: st bus , train
  • First Published :
जाहिरात
जाहिरात