नाशिक 28 ऑगस्ट : दारू पिऊन एका महिलेनं बसमध्ये धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या घोटी बस स्थानकातून शेणीत पेहिरीकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये ही घटना घडली. या महिलेनं गाडीतील वाहक आणि प्रवाशांना शिव्या देत बराच धिंगाणा घातला. यानंतर चालकाने बस थेट घोटी पोलीस ठाण्यात नेली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ बसमधील व्यक्तींनी शूट केला असून तो सध्या समोर आला आहे. लाथ लागल्याने धावत्या ट्रेनमधून खाली फेकलं; तरुणाचा मृत्यू, नागपूर-पुणे गरीबरथमधील घटना रात्रीच्या वेळी एसटी बसमधून प्रवास करताना या महिलेनं एसटी बसच्या वाहकाला आणि चालकाला शिविगाळ करत त्यांच्यासोबत हुज्जत घातली. शेवटी महिलेच्या या कृत्याला कंटाळून बस चालकाने धिंगाणा घालणाऱ्या महिलेला पोलिसांच्या हवाले केलं. मात्र, तिथेही महिला शांत झाली नाही. समोर पोलिसांना पाहूनही तिची नशा उतरली नाही आणि तिने पोलिसांनाही अर्वाच्य भाषेमध्ये शिविगाळ करण्यास सुरुवात केली. पोलीस ठाण्यातही महिला शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या तर्राट महिलेनं बसमध्ये एकच गोंधळ घातला. सुरुवातीला तिने चालकाला शिवीगाळ केली आणि नंतर बसमधील प्रवाशांनाही ती शिवीगाळ करू लागली. यानंतर बसमध्ये बसलेल्यांपैकी कोणीतरी बस पोलीस ठाण्यात घेण्याचा सल्ला दिला. मात्र, महिला इतकी नशेत होती, की तिला पोलिसांचीही भीती राहिली नाही. पोलिसांसमोरही ती समोर उभा असलेल्या लोकांना शिवीगाळ करू लागली. गर्लफ्रेंडला फिरण्यासाठी हवी होती नवीन मॉडेलची दुचाकी, नागपुरातील प्रियकरानं तब्बल… ही महिला आदिवासी समाजातील मुलांबाबत बोलत होती. यासोबतच ती शिवीगाळ करत मी काहीही केलं नसल्याचं सांगत होती. महिला पोलिसाने यादरम्यान महिलेचे दोन्ही हात पकडून ठेवलेले दिसले. या घटनेमुळे पोलीस ठाण्यातही गोंधळ उडाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.