जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्यात आणखी एक राजकीय घराणं फुटलं, वडील-मुलगा शिवसेनेत, तर मुलीने धरली शिंदे गटाची वाट!

राज्यात आणखी एक राजकीय घराणं फुटलं, वडील-मुलगा शिवसेनेत, तर मुलीने धरली शिंदे गटाची वाट!


माजी समाज कल्याण मंत्री तसंच 5 वेळा आमदार राहिलेल्या बबन घोलप यांच्या घराला या प्रवेशामुळे सुरुंग लागला आहे

माजी समाज कल्याण मंत्री तसंच 5 वेळा आमदार राहिलेल्या बबन घोलप यांच्या घराला या प्रवेशामुळे सुरुंग लागला आहे

माजी समाज कल्याण मंत्री तसंच 5 वेळा आमदार राहिलेल्या बबन घोलप यांच्या घराला या प्रवेशामुळे सुरुंग लागला आहे

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 11 जानेवारी : एकीकडे शिवसेनेसमोर अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीये, तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये इन्कमिंग सुरूच आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुजा घोलप आता शिंदे गटात प्रवेश करणार आहे. त्यामुळे सेनेला मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुजा घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान तनुजा घोलप यांनी शिंदे गटात प्रवेशाची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिला. बबन घोलप हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहे. (शिवसेनेवर आता आणखी एक नवं संकट, उद्धव ठाकरेंचं पद धोक्यात? उरले फक्त 12 दिवस!) माजी समाज कल्याण मंत्री तसंच 5 वेळा आमदार राहिलेल्या बबन घोलप यांच्या घराला या प्रवेशामुळे सुरुंग लागला आहे. पिता, पुत्र आणि एक कन्या माजी महापौर नयना घोलप शिवसेना उद्धव ठाकरे गटात आहे. तर दुसरी कन्या तनुजा घोलप लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी सकारात्मक चर्चा झाली आहे. (( अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया ) विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या उपस्थित झालेल्या मेळाव्याला माजी मंत्री बबन घोलप, माजी आमदार योगेश घोलप, कन्या माजी महापौर नयना घोलप उपस्थितीत होते. आता तनुजा घोलप यांनी शिंदे गटाचा मार्ग निवडल्यामुळे एकाच घरात दोन पक्ष झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात