मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO:..अन् शेवटी ब्लँकेटची झोळी करून गरोदर महिलेला रुग्णालयात नेलं; नाशिकमधील मनाला चटका लावणारं दृश्य

VIDEO:..अन् शेवटी ब्लँकेटची झोळी करून गरोदर महिलेला रुग्णालयात नेलं; नाशिकमधील मनाला चटका लावणारं दृश्य

सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की एका गरोदर महिलेला नेण्यासाठी कुटुंबीयांनी ब्लँकेटची झोळी केली आहे आणि ते यातूनच महिलेला रुग्णालयात घेऊन जात आहेत.

  • Published by:  Kiran Pharate
नाशिक 13 ऑगस्ट : देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, 75 वर्षानंतरही इथल्या अनेक नागरिकांना अगदी मुलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचं चित्र अनेकदा समोर येत आहे. देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये अगदी झपाट्याने विकास होत असताना काही गावं मात्र आजही मुलभूत सुविधांच्या प्रतिक्षेत आहेत. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील हत्तीपाडा येथून समोर आला आहे. माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल नाशिकच्या हत्तीपाडा येथे रस्ताच नसल्याने रुग्णांना उपचारासाठी चक्क झोळीमध्ये न्यावं लागत असल्याची परिस्थिती आहे. सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की एका गरोदर महिलेला नेण्यासाठी कुटुंबीयांनी ब्लँकेटची झोळी केली आहे आणि ते यातूनच महिलेला रुग्णालयात घेऊन जात आहेत. हत्तीपाडा येथील ग्रामस्थांनीच हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. गावातील असुविधांमुळे सहन करावा लागणारा हा त्रास समोर आणण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काही लोक एका महिलेला झोळीमध्ये टाकून रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहेत. राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेट अन् काही वेळात मृत्यू! अशाप्रकारचं भीषण वास्तव दाखवणारा हा पहिलाच व्हिडिओ नाही. तर या आधीही रस्त्याच्या समस्या दाखवणारे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. आणखी एका घटनेत रस्ता नसल्याने या भागात तीन वर्षापूर्वी सर्पदंश झाल्यामुळे एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यूही झाल्याचं ग्रामस्थांच म्हणणं आहे. प्रशासनाकडून व्हिडिओची सत्यता पडताळून याबाबत दखल घेण्याची गरज आहे. स्वांतत्र्याच्या 75 वर्षांनंतरही रस्त्याअभावी दिसणारं हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे.
First published:

Tags: Pregnant woman, Shocking video viral

पुढील बातम्या