जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत. यादरम्यान राजस्थानमध्ये एक अनोखी घटना पाहायला मिळाली. येथे एका महिलेने चक्क बिबट्याला राखी बांधल्याची घटना घडली. विशेष म्हणजे बिबट्यानेही शांतपणे राखी बांधून घेतली. त्याने महिलेवर हल्ला केला नाही. भावांना राखी बांधायला माहेरी जात होती तेव्हा… ही घटना राजसमंद जिल्ह्यातील आहे. खेडा गावातील महिला लिला आपल्या पतीसह गाडीवरुन माहेरी जात होती. यादरम्यान रस्त्यात तिला एक जखमी बिबट्या चालताना दिसला. तिने पतीला गाडी रोखण्यास सांगितलं. पतीने गाडी थांबवताच ती महिला बिबट्याच्या जवळ गेली. आणि त्याच्या पायावर राखी बांधली. महिलेने याचा एक व्हिडीओही केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यादरम्यान बिबट्याने महिलेवर हल्ला केला नाही.
For ages, man & animal in India have lived in harmony with unconditional love to the wild.
— Susanta Nanda (@susantananda3) August 12, 2022
In Rajasthan, a lady shows this unfettered love to our wild by tying a Rakhi(symbol of love & brotherhood ) to an ailing Leopard before handing over to Forest Department.
(As received) pic.twitter.com/1jk6xi1q10
बिबट्या काही कारणास्तव जखमी झाला होता. तो गावाच्या दिशेने जात होता. ज्यानंतर लोक त्याचा व्हिडीओ शूट करू लागले. महिलेने बिबट्याला राखी बांधल्यानंतर तेथील काहींनी याबाबत वन विभागाला कळवलं. तब्बल 2 तासांनंतर वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचले. आणि बिबट्याला उपचारासाठी सोबत घेऊन गेले. भावाच्या रक्षणासाठी दोघी बहिणींनी बनवली स्मार्ट राखी; भाऊ अडचणीत असतील तेव्हा वाजणार अलार्म येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. राजसमंद जिल्ह्यातील घटदाट जंगलात अनेक बिबटे आहेत. टेरिटोरियल भांडतान बिबट्या जखमी झाल्याची शक्यता आहे. जो रस्ता भटकला आणि गावाच्या दिशेने जाऊ लागला.