जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेट अन् काही वेळात मृत्यू!

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेट अन् काही वेळात मृत्यू!

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेट अन् काही वेळात मृत्यू!

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे.

  • -MIN READ Rajasthan
  • Last Updated :

सवाई माधोपुर, 12 ऑगस्ट : राजस्थान राज्यातील गंगापूर शहराच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक विवाहित आपल्या माहेरी आली होती. मात्र, आपल्या विवाहित प्रेयसीला भेटणे एका प्रियकराला चांगलेच महागात पडले. तसेच त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी सदर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - जलोखरा गावाजवळ पोलिसांना मृतदेह आढळून आला होता. यानंतर या घटनेची माहिती मिळताच सदर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर गंगापूर शहरातील सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन करण्यात आले आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. तरुणाच्या हत्येमागे अतिशय धक्कादायक कारण समोर आले आहे. याप्रकरणी तरुणाच्या कुटुंबीयांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत बरकत अलीचे बार जलोखरा येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मुलीचे लग्न झाले आहे. रक्षाबंधनाच्या सणामुळे विवाहित प्रेयसी तिच्या बाढ़ जलोखरा माहेरी आली होती. अशा स्थितीत बरकत अली या आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. हेही वाचा -  Andhra Pradesh Crime : सुनेचं मुंडकं कापून सासूनं पोलीस ठाणे गाठलं, मुंडकं रस्त्यावरून नेताना लोकांचा थरकाप मुलीने फोन करून तिला भेटायला बोलावले होते आणि तरुणीसह तिच्या कुटुंबीयांनी बरकत अलीची हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात