नाशिक 2 जानेवारी : नव्या इच्छा आणि स्वप्न डोळ्यात ठेवून सर्वांनीच 2023 चं स्वागत केलंय. यावर्षी राज्यातील प्रमुख शहरांमधील महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. त्याचबरोबर पालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी, महापौरपदासाठी इच्छूक असलेल्या सर्व राजकीय नेत्यांसाठी देखील हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक वर्षांपासून जपलेलं आपलं स्वप्न यावर्षी तरी पूर्ण होणार का? याकडे त्यांचं लक्ष लागलंय. नाशिकचे ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी वर्षाचं राशीभविष्य सांगताना राजकीय व्यक्तींच्या भवितव्याबद्दलचं अत्यंत महत्त्वाचं भविष्य सांगितलं आहे. कोणत्या राशीच्या उमेदवारांना फायदा? 2023 या नवीन वर्षात कुंभ,तूळ,आणि वृषभ या तीन राशीतील व्यक्तींना चांगला फायदा होईल,त्यांच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडतील अस ज्योतिष अभ्यासक डॉ.नरेंद्र धारणे यांचं मत आहे. कुंभ राशीचा स्वामी शनिच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी 29 वर्षांनी शनि महाराज पूर्णतः आता कुंभ राशीला जात आहेत. स्वतःची आवडती शनि महाराजांची रास असल्यामुळे हे वर्ष कुंभ राशीसाठी सर्व मार्गाने अत्यंत उत्तम म्हणजे संपूर्ण राशिचक्र मध्ये सगळ्यात चांगला वर्षे कुंभ राशीसाठी असणार आहे. या वर्षी शनी महाराज कुंभ राशींच्या लोकांना कोणत्याही साडेसातीचा त्रास होणार नाही. कुंभ राशी असणाऱ्या सर्वांना हे वर्ष चांगले आहे. या राशीच्या व्यक्तींना राजकीय क्षेत्रातही मोठा फायदा होईल. यावर्षी निवडणुका जिंकणारे सर्वाधिक व्यक्ती या कुंभ राशीच्या असतील, असं भविष्य धारणे यांनी व्यक्त केलंय. VIDEO: दादांच्या लढाईत कोण होणार पुण्याचा कारभारी? ज्योतिषांनी सांगितलं 2023 चं भविष्य तुळ आणि वृषभला फायदा ‘तुळ राशीचा स्वामी आहे शुक्र,तूळ राशीच्या दृष्टीने हे वर्षे अत्यंत चांगलं असेल. तुळ राशीचा योगकार ग्रह शनी या वेळेस आता संक्रांतीला मकर राशीतून जात असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींना याचा फायदा होईल. त्यांच्याकडून लाँग टर्म प्लॅनिंग घडू शकते. त्याचबरोबर त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी घडतील,’ असं भारणे यांनी सांगितलं.
वृषभ राशीच्या व्यक्ती प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात. 2023 साली त्यांची ही विचारसरणी त्यांना उपयुक्त ठरणार आहे. उद्योग, व्यापार किंवा कौटुंबीक गोष्टी वृषभ राशीसाठी 2023 आनंदाचं असेल, असं भविष्य भारणे यांनी सांगितलं आहे.