नाशिक, 17 एप्रिल : नाशिक जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुनील मोरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. ते उद्या 18 एप्रिलला शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. सुनील मोरे हे छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादीसोबतच छगन भुजबळ यांच्यासाठी देखील हा मोठा धक्का आहे. बावनकुळेंची भेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मालेगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सुनील मोरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर मोरे यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. सुनील मोरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. ते उद्या 18 एप्रिलला शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुनील मोरे यांचा ग्रामीण भागामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे भाजपला नाशिकच्या ग्रामिण भागामध्ये फायदा होऊ शकतो.
अजित पवारांची चर्चा दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हे वृत्त फेटाळण्यात आलं आहे. अजित पवार नाराज नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. ज्या झाडाला आंबे अधिक त्याच झाडाला लोक दगड मारतात असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.