लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी मुंबई, 5 जुलै : राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडाचे पडसाद आता उमटायला सुरूवात झाली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्याकडून आज जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. अजित पवार यांच्यासोबत जास्त आमदार असल्याचं चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे 40 पेक्षा जास्त आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात आला. यातल्या नाशिक जिल्ह्यातल्या आमदार सरोज अहिरे या आजच्या कोणत्याच मेळाव्याला गेल्या नव्हत्या. हॉस्पिटलमध्ये असलेल्या सरोज अहिरे यांनी तिथूनच पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. काय म्हणाल्या सरोज अहिरे? ‘नवीन आमदारांचं प्रचंड मरण आहे. दादा आणि साहेब यांच्यात निवडणं अवघड आहे. आमच्या सारख्या आमदारांची अडचण होत आहे. माझ्या कामासाठी मी देवगिरी बंगल्यावर गेले होते. म्हणून मी सही कली आणि शपथविधीला गेले. सही घेतल्यानंतर मला राजभवनावर जायचं आहे, असं सांगण्यात आलं,’ असं सरोज अहिरे म्हणाल्या. शपथविधीच्या दोन दिवस आधीच अजितदादांनी टाकला डाव, शरद पवारांचं अध्यक्षपदच धोक्यात? ‘मी सुप्रिया ताई आणि साहेबांशीपण चर्चा केली. चार तारखेला माझी सर्जरी होती, माझं बाळ लहान आहे म्हणून मी आले. आमच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास आहे, म्हणून मी सही केली. इतर आमदारांनी पण सही केली. जनतेच्या मतावर आमदार झाले, मतदारांचा कौल घेऊन निर्णय घेईन. माझी मानसिक स्थिती नाही, मला चॉईस करता येत नाही. मी सही केली म्हणून माझा पाठिंबा त्यांनी गृहित धरला. दोघांपैकी एकाला निवडणं म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया सरोज अहिरे यांनी दिली आहे. ‘एक वर्षांनी निवडणुका होणार म्हणून हा मोठा प्रश्न आहे. साहेब आणि दादा आमच्यासाठी एकच आहेत. साहेब आमच्या मनात हा डायलॉग नाही. मतदारांना सांगत आहे, मला मानसिक तणाव आहे. रुग्णालयातील आटोपलं की मी बोलेन. आई आणि बायको यातून निवडणं जसं कठीण असतं तसंच ही बाब माझ्यासाठी आहे. येवल्यातल्या सभेला बरं वाटलं तर जाईन,’ असं सरोज अहिरे म्हणाल्या. ‘काही कामांना स्थगिती होती, मुख्यमंत्र्यांनी ही स्थगिती उठवली. जनता म्हटलं काम नको म्हणली तर साहेबांसोबत जाईन, विकासकामं म्हणली तर दादांसोबत जाईन. राजकारणात कधी काहीही होऊ शकतं मी आकलन करू शकत नाही. मतदारसंघातील प्रमुख लोकांशी चर्चा करेन आणि नंतर माझी भूमिका जाहीर करेन,’ असं वक्तव्य सरोज अहिरे यांनी केलं आहे. भाजपसोबत जायचं चार वेळा ठरलं, प्रत्येकवेळी काय झालं? अजित पवारांनी बॉम्ब फोडले!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







