जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 1500 फूट उंचीवर असलेल्या धबधब्यावर अंघोळ करत होते, पाय घसरला आणि...

1500 फूट उंचीवर असलेल्या धबधब्यावर अंघोळ करत होते, पाय घसरला आणि...

अंघोळ करत असतांना खडकावर शेवाळ असल्याने त्याचा पाय घसरला आणि तो 1500 फूट खाली खडकावर आपटल्याने डोक्याला गंभीर इजा झाली

अंघोळ करत असतांना खडकावर शेवाळ असल्याने त्याचा पाय घसरला आणि तो 1500 फूट खाली खडकावर आपटल्याने डोक्याला गंभीर इजा झाली

अंघोळ करत असतांना खडकावर शेवाळ असल्याने त्याचा पाय घसरला आणि तो 1500 फूट खाली खडकावर आपटल्याने डोक्याला गंभीर इजा झाली

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 24 नोव्हेंबर : नाशिक जिल्ह्यात ल्या सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड उंबरपाडा तातापाणी गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकासोबत दुर्दैवी घटना घडली. साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन पडल्याने सुरत येथील सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल दीड हजार फुटावरून हा तरुण खाली पडला आणि यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तक्षिल संजाभाई प्रजापती (वय १८) असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी होता. त्याच्या दहा ते बारा मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे सहलीसाठी आला होता. दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास हे सर्वजण उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील वाहूटचोंड शॉवर पॉईट धबधब्यावर पोहोचले. तिथे अंघोळ करत असतांना खडकावर शेवाळ असल्याने त्याचा पाय घसरला आणि तो 1500 फूट खाली खडकावर आपटल्याने डोक्याला गंभीर इजा झाली त्यामुळें त्याचा जागीच मृत्यू झाला. (धक्कादायक! मनमाडमध्ये रेल्वेत प्रवाशांवर माथेफीरूचा अ‍ॅसिड हल्ला; चार जण जखमी) या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळवताच सदर ठिकाणी पोलीस आणि वन कर्मचारी अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यांनतर सुमारे दीड हजार फूट खोल दरीतून पंचनामा करून मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने तिवशाची माळी येथे रस्त्यावर काढण्यात आला. त्यानंतर पाच वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ( ‘इस्लाम स्वीकारला तर लग्न करेल’; आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं मग धमकी देत… ) या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. या परिसरात सुट्टीच्या दिवशी प्रामुख्याने गुजरात राज्यातील आणि नाशिकसह राज्यभरातील पर्यटक येत असल्याने गर्दी होत असते आणि तरुण मंडळी देखील मोठ्या प्रमाणात येत असल्याने काही उपद्रवीकडून या ठिकाणी गोंधळ होत असल्याने याचा नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास होत असतो. अनेक लहान मोठ्या घटना देखील असतात. त्यामुळे पोलिसांनी तसंच वन विभागाणे उपाययोजना कराव्या अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात