मनमाड, 23 नोव्हेंबर : मुंबईहून दरभंगाकडे जाणाऱ्या पवन एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. एका माथेफिरूने प्रवाशांवर चक्क अॅसिड हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन या माथेफिरूला ताब्यात घेतले. माथेफिरूला वेळीच ताब्यात घेण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. धनेशवर यादव असं अॅसिड हल्ला केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मात्र त्यानं असं का केलं याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. प्रवाशांमध्ये घबराट घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पवन एक्स्प्रेस मुंबईहून दरभंगाकडे निघाली होती. मनमाड रेल्वे स्थानकावर अचानक एका माथेफिरून ट्रेनच्या एसी डब्यामध्ये प्रवाशांवर अॅसिड हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावर निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ जवानांनी डब्यात धाव घेऊन संबंधित माथेफीरूला पकडं. मात्र त्यांने या जवानांवर देखील अॅसिड हल्ला केला. धनेशवर यादव असं या व्यक्तीचं नाव असून तो भागलपूरचा रहिवासी आहे. मात्र त्याने अॅसिड हल्ला का केला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नसून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखत या माथेफिरूला ताब्यात घेतलं. थोडा जरी उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. हल्ल्यात चार जण जखमी माथेफीरूने केलेल्या या हल्ल्यात चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. ज्यामध्ये दोन आरफीएफ जवान आणि दोन प्रवाशांचा समावेश आहे. धर्मेंद्र यादव आणि विनायक आठवले असं या घटनेत जखमी झालेल्या जवानांचं नाव आहे. आरफीएफ जवानांनी संबंधित व्यक्तीला वेळीच ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.