मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! 'इस्लाम स्वीकारला तर तुझ्याशी लग्न करेल'; आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं मग धमकी देत...

धक्कादायक! 'इस्लाम स्वीकारला तर तुझ्याशी लग्न करेल'; आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं मग धमकी देत...

फाईल फोटो

फाईल फोटो

इतकंच नाही तर आरोपीने तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं. त्याने मुलीला वचन दिलं की जर तिने इस्लाम स्वीकारला तर तो तिच्याशी लग्न करेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Karnataka, India
  • Published by:  Kiran Pharate

बंगळुरू 24 नोव्हेंबर : कर्नाटकमधून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यात एका मुस्लीम व्यक्तीने एका हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार तर केलाच, पण नंतर तिला धर्मांतर करण्यास भाग पाडलं आणि न्यूड फोटो काढून तिला ब्लॅकमेल केलं. धर्मांतर विरोधी कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यान्वये एका 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि नग्न फोटो काढल्याबद्दल पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.

इतकंच नाही तर आरोपीने तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं. त्याने मुलीला वचन दिलं की जर तिने इस्लाम स्वीकारला तर तो तिच्याशी लग्न करेल. ही घटना मांडया जिल्ह्यातील असून युनूस पाशा (२५) असं आरोपीचं नाव आहे. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि तिचे नग्न फोटो काढले. अल्पवयीन मुलीने इस्लाम स्वीकारल्यास तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासनही त्याने दिलं. त्याच्याविरुद्ध नवीन धर्मांतर विरोधी कायदा आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विवाहित आहे.

माझी बायको होशील का? 13 वर्षीय मुलीसाठी मुलाचं इन्स्टा स्टेटस; पुण्यातील प्रकार

फर्स्टपोस्टनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीला सांगितलं की सांबरमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून संपूर्ण कुटुंबाला खायला दे. आरोपी पाशा मुलीचा मित्र बनल्यानंतर त्याने तिला एक ओप्पो मोबाईल फोन आणि एक सिमकार्ड भेट दिलं. यानंतर त्याने मुलीला व्हॉट्सअॅप कॉल करण्यास सांगितलं आणि व्हिडिओ कॉल दरम्यान त्याने मुलीचे खाजगी फोटो क्लिक केले तसंच न्यूड व्हिडिओ रेकॉर्ड केला.

मुलीने मुस्लीम तरुणावर कॉल रेकॉर्ड केल्याचा आणि नंतर व्हिडिओ कॉल दरम्यान तिचे प्रायव्हेट पार्ट दाखवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर 11 नोव्हेंबरला मुलीचे आई-वडील घरी नसताना आणि ती फक्त आजीसोबत असताना आरोपीने मुलीच्या घरात प्रवेश केला. यानंतर त्याने तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने अल्पवयीन मुलीला तिच्या आजीला झोपेच्या गोळ्या देण्यास सांगितलं आणि ती झोपी गेल्यावर त्याने पीडितेवर बलात्कार केला.

विवाहित प्रेयसी दुर्लक्ष करत असल्याने चढला पारा; पुण्यातील प्रियकराने गाठला क्रूरतेचा कळस

या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या मुलीच्या वागण्यात बदल झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आहे. ते पुढे म्हणाले की, 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी मुलगी तणावात असल्याचं दिसलं आणि विचारल्यावर मुलीने संपूर्ण घटना सांगितली.

11 नोव्हेंबर रोजी मुस्लीम तरुण तिच्या घरी आला आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केला आहे. तिने इस्लाम धर्म स्वीकारल्यास तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासनही त्याने दिले. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास आरोपीने मुलीसह तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

First published:

Tags: Crime news, Shocking news