नाशिक, 22 जुलै : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा दणका दिला आहे. ठाकरेंच्या मर्जीतील नाशिक मनपा आयुक्त रमेश पवारांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पवार हे आदित्य ठाकरेंचे निकटस्थ असल्याची चर्चा होती. त्यामुळले आता रमेश पवार यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आता नाशिकचे नवे मनपा आयुक्त असणार आहेत. पुलकुंडवार हे एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकारी असून कार्यकाळ पूर्ण नसतांना रमेश पवारांची उचलबांगडी करत ठाकरेंना दणका देण्यात आला आहे. पुलकुंडवार हे MSRDC या खात्याचे अधिकारी होते. पवार यांची अवघ्या 1 महिना 7 दिवसात बदली करण्यात आली आहे. डॉ पुलकुंडेवार हे IAS अधिकारी आहेत. त्यामुळे नाशिक पालिकेला मिळणार IAS अधिकारी आयुक्त म्हणून लाभणार आहे. दरम्यान आदित्य ठाकरे सध्या राज्यभरात संवाद यात्रा करीत आहे. आज ते नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. चांगला मुख्यमंत्री असतानाही या लोकांनी बंडखोरी केली. गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. गद्दारी का केली याचं उत्तर त्यांनी आधी द्यावं, असा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला. आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. यावेळी त्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. चांगला मुख्यमंत्री असतानाही या लोकांनी बंडखोरी केली. गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. गद्दारी का केली याचं उत्तर त्यांनी आधी द्यावं, असा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.