Home /News /maharashtra /

'एकच चूक झाली, पण ती आम्ही कधीच सुधारणार नाही' नाशकात कोणत्या चुकीबद्दल बोलले आदित्य ठाकरे?

'एकच चूक झाली, पण ती आम्ही कधीच सुधारणार नाही' नाशकात कोणत्या चुकीबद्दल बोलले आदित्य ठाकरे?

आम्ही राजकीय माणसं नाहीत. राजकारण आम्हाला जमलं नाही. आम्ही लोकांवर लक्ष ठेवलं नाही. ही एकच चूक झाली, असं आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यावेळी बोलताना म्हणाले.

    नाशिक 22 जुलै : मनमाडमध्ये आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. यावेळी त्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. चांगला मुख्यमंत्री असतानाही या लोकांनी बंडखोरी केली. गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. गद्दारी का केली याचं उत्तर त्यांनी आधी द्यावं, असा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला. CM Eknath Shinde : नेमकं राष्ट्रपती कोण? मुख्यमंत्री शिंदेंची राष्ट्रपतींच्या अभिनंदनाची पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय मविआ सरकारनं अडीच वर्ष चांगलं काम केलं. उद्धव ठाकरे यांच्या कामाची देशाने दखल घेतली. या बंडखोरांना शिवसेनेनं ओळख दिली, त्यांच्याच पाठीत यांनी खंजीर खुपसलं. आम्ही राजकारण करू शकलो नाही. आम्ही राजकीय माणसं नाहीत. राजकारण आम्हाला जमलं नाही. आम्ही लोकांवर लक्ष ठेवलं नाही. ही एकच चूक झाली, असं आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. पुढे ते म्हणाले, फोडाफो़डीचं राजकारण आम्हीही करू शकलो असतो. विरोधी पक्षाला नोटीसा पाठवल्या असत्या. त्रास दिला असता. पण आम्ही हे केलं नाही. आम्ही प्रेम दिलं आणि विश्वास ठेवला, हीच चूक झाली. पण ती चूक आम्ही सुधारणार नाही. कारण माणुसकी आमच्यात आहे. बंडखोरांच्यात एवढीच हिंमत होती तर अडीच वर्ष शांत का राहिले. मांडीला मांडी लावून पाठीत खंजीर का खुपसला? असा सवाल आदित्या ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नव्हते. आमच्या अडचणी ऐकून घेत नव्हते, असा आरोप बंडखोर आमदारांनी केला होता. यावरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे भेटू शकले नाही, कारण त्यांच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Shivsena

    पुढील बातम्या