नाशिक, 3 फेब्रुवारी: नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे (Dr Suvarna Vaje) यांचा एका गाडीत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या घटनेप्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. जळालेल्या गाडीत (burnt car) आढळलेल्या मृतदेहाचा डीएनए अहवाल आला आहे. या अहवालानुसार, मृतदेहाचा डीएनए आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए एकच असल्याचं निष्पन्न झाले आहे. त्यामुळे डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या केली असावी असं दिसून येत आहे.
डॉ. सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेच्या सिडको रुग्णालयात (Nashik Municipal Corporation CIDCO hospital) वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. 25 जानेवारी रोजी शहरालगत असलेल्या रायगड नगर परिसरात एका जळालेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली. डॉ. सुवर्णा वाजे या बेपत्ता होत्या. त्या संदर्भात त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार सुद्धा दिली होती.
जळालेल्या गाडीचा चेसी नंबर आणि गाडी नंबर यावरुन ही गाडी डॉ. सुवर्णा वाजे यांची असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर मृतदेहाचा डीएनए तपासण्यात आला. मृतदेहाचा डीएनए आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए एकच असल्याचं समोर आलं आहे. जळालेल्या गाडीत आढळून आलेली हाडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ते डॉ. सुवर्णा वाजे यांचेच असल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा : जळालेल्या गाडीत आढळला पालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह
25 जानेवारी रोजी नेमकं काय घडलं होतं? डॉ सुवर्णा वाजे या गाडीतून एकट्याच गाडीतून गेल्या होत्या की त्यांच्यासोबत आणखी कोण होतं? याचाही तपास पोलीस करत आहेत. तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारेही पोलीस तपास करत आहेत. जळालेल्या गाडीत आढळेला मृतदेह हा डॉ. सुवर्णा वाजे यांचाच असल्याने हा एक घातपात असल्याचं बोललं जात आहे.
डॉ सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या. कोरोनाच्या काळात त्यांनी खूपच चांगले काम केले होते. त्यांच्या कामामुळे त्यांचं कौतुकही झालं होतं. 25 जानेवारी रोजी सुद्धा त्या कामावर होत्या. काम आटोपल्यानंतर त्या रुग्णालयातून निघाल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Burning car, Crime, Death, Muncipal corporation, Murder, Nashik, Shocking news, Woman doctor