Home /News /nashik /

जळालेल्या गाडीत आढळला पालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह

जळालेल्या गाडीत आढळला पालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह

Nashik Breaking News: महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या वाडीवऱ्हे या परिसरात एका जळालेल्या वाहनात मृतदेह आढळून आला आहे.

    नाशिक, 26 जानेवारी: नाशिकमधून (Nashik) एक ब्रेकिंग न्यूज (Breaking News) समोर आली आहे. महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या वाडीवऱ्हे या परिसरात एका जळालेल्या वाहनात मृतदेह आढळून आला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. डॉ सुवर्णा वाझे-जाधव यांचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ माजली आहे. वाझे या महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मनपा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. नाराज कार्यकर्त्यांना कसं खूश करायचं?, बिझी अजित पवारांनी सांगितलं सिक्रेट महानगरपालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार डॉ. सुवर्णा वाजे या मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. वाझे यांचा स्वतःच्या कारमध्ये पूर्ण जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव गेतली. या वृत्ताला दुजोरा दिला असून पोलीस तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Nashik

    पुढील बातम्या