मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोठी बातमी ! नाशिक शहरात 13 डिसेंबरपासून पहिले ते सातवीपर्यंतची शाळा सुरु होणार

मोठी बातमी ! नाशिक शहरात 13 डिसेंबरपासून पहिले ते सातवीपर्यंतची शाळा सुरु होणार

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने नाशिक महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिका हद्दीतील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या 13 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने नाशिक महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिका हद्दीतील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या 13 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने नाशिक महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिका हद्दीतील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या 13 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत

नाशिक, 9 डिसेंबर : देशात आणि राज्यात कोरोनाचा ओमायक्रोन या नव्या विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासन सतर्क झालं होतं. त्यामुळे अनेक ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुरु होणाऱ्या शाळांच्या वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने नाशिक महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिका हद्दीतील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या 13 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. प्रशासनाने याआधी 10 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता 13 डिसेंबरपासून शहरातील शाळा सुरु होतील, अशी अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे.

नाशिक महापालिकेने शाळा सुरु करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे:

1) शाळेत स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण विषय सुविधा सुनिच्छित करणे :

- शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे.

- तापमापक, जंतूनाशक, साबण-पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंची तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने सुनिश्चित करावे.

- ज्या ठिकाणी वाहतूक सुविधेचा वापर येणार आहे अशा शाळांनी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.

- एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर किंवा कोविड सेंटर असल्यास स्थानिक प्रशासाने ते इतर ठिकाणी स्थलांतरित करावे. तसेच अशा शालांचे निर्जंतुकीकरण केलं जावं.

हेही वाचा : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 247 कोटींचे हेरॉईन जप्त, आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई

2) शिक्षकांच्या कोरोना चाचणीबाबत :

- शिक्षकांची कोरोना चाचणी करावी. शाळा सुरु करण्याच्या 48 तासांआधी शाळेच्या सर्व शिक्षण आणि स्टाफने आरटीपीसीआर टेस्ट करावी. त्याचे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाकडे सादर करावे. त्याची पडताळणी करुनच शाळा व्यवस्थापने संबंधित शिक्षक किंवा कर्मचाऱ्याला शाळेत येण्याची अनुमती द्यावी.

- ज्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल त्यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतरच शाळेत उपस्थित राहावे. शाळेच्या प्रमुखांनी आजारी असल्याच्या कारणांमुळे कर्मचाऱ्यास रजेवर राहण्याची परवानगी द्यावी.

- ज्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय त्यांनी शाळेत उपस्थित राहताना कोरोना संदर्भातील सर्व मार्गदर्शन सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच कोरोना संबंधित लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने चाचणी करावी.

3) बैठक व्यवस्था :

- वर्गखोलीत किंवा स्टाफ रुममधील बैठक व्यवस्थेत शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे.

- वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी.

- बैठक व्यवस्थेत दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवावे.

- विद्यार्थ्यांचे नाक आणि तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे. याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे.

हेही वाचा : भररस्त्यात दीर कुऱ्हाड घेऊन पळत होता वहिनीच्या मागे;हत्येचा थरारक VIDEO आला समोर

4) शारीरिक अंतराच्या नियमांचे पालनासाठी अंमलबजावणी

- सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालनासाठी अंमलबजावणी करावी.

- थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.

5) शाळेतील कार्यक्रम आयोजनावर निर्बंध

6) पालकांची संमती महत्त्वाची आहे. तसेच पालकांनी देखील काळजी घ्यावी. आजरी किंवा लक्षणे असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये.

First published:
top videos