मुंबई, 9 डिसेंबर : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) एअर इंटेलिजन्स यूनिटने (AIU) मोठी कारवाई केली आहे. विमानतळावर आलेल्या दोन परदेशी नागरिकांकडे तब्बल 247 कोटींचे ड्रग्ज (Drugs) सापडलं आहे. आरोपींकडे तब्बल 35 किलो हेरॉईन (Heroin) सापडलं आहे. याप्रकरणी एआययूने दोन परदेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. विमानतळावर दोन व्यक्ती अशाप्रकारे ड्रग्ज घेऊन येणार असल्याची गुपित माहिती डीआरआयला (DRI) सूत्रांकडून मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासातील ही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वात मोठी कारवाई आहे. दोन परदेशी नागरिकांना ड्रग्जची तस्करी करताना रंगेहात पकडण्यात आलंय. याप्रकरणी हेरॉईनच्या चार बॅग जप्त करण्यात आल्या आहेत.
Air Intelligence Unit (AIU) at Mumbai International Airport has seized around 35 kg heroin worth approximately Rs 247 crores, two Zimbabwe nationals arrested: AIU
— ANI (@ANI) December 9, 2021
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रग्जची खेप पुरविण्यासाठी मुंबईत आले होते. अटक करण्यात आलेले ड्रग्ज तस्कर हे झिम्बाब्वेचे नागरीक आहेत. ते पार्टीसाठी ड्रग्जचा सप्लाय करण्यासाठी आले होते. त्यांची चौकशी सध्या सुरु आहे. अटक केलेल्यांमध्ये 46 वर्षीय पुरुष आणि 27 वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे आरोपी हरारे येथून निघाले होते. त्यांनी एडिस अबाबा येथून हेरॉईन घेतले होते. त्यानंतर ते मुंबईला आहे होते.
हेही वाचा : भररस्त्यात दीर कुऱ्हाड घेऊन पळत होता वहिनीच्या मागे;हत्येचा थरारक VIDEO आला समोर
विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ही पहिलीच कारवाई नाही. ईनीसीने गेल्या महिन्यात 4 नोव्हेंबरला अशीच एक कारवाई केली होती. एनसीबीने विमानतळावर इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनल सहार कार्गोकॉम्प्लक्स येथून 700 ग्रॅम हेरॉईन जप्त केलं होतं. त्याची किंमत तब्बल 4 कोटी इतकी होती. याप्रकरणी एनसीबीने कृष्ण मुरारी प्रसाद नावाच्या इसमाला अटक केली होती.
हेही वाचा : मरना मना है! इथं कधी कुणीच मरत नाही; धक्कादायक आहे कारण
विशेष म्हणजे त्यानंतरही कस्टम विभागाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई 24 नोव्हेंबरला करण्यात आली होती. कस्टम विभागाने 4 किलो हेरॉईन जप्त केलं होतं. त्याची किंमत तब्बल 20 कोटी रुपये इतकी होती. याप्रकरणी दोन परदेशी महिलांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे युगांडाचे पासपोर्ट मिळालं होतं. अटक केलेल्या महिलांमध्ये क्यांगेरा फातुमा आणि तिची मुलगी मान्सिम्बे जयानाह यांच्या समावेश होता. त्यांनी जुबा सूडान ते दुबई आणि नंतर दुबई ते मुंबई असा प्रवास केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.