शिवपुरी, 9 डिसेंबर : शिवपुरीतील (Madhya Pradesh News) भौती भागातील एका दीराने कौटुंबिक वादातून भाच्यासमोर आपल्या वहिनीवर कुऱ्हाडीने (Murder) वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एक थरारक व्हिडीओदेखील समोर (Crime News) आला आहे. मुलगा आपल्या आईला वाचवण्यासाठी पुढे आला, मात्र आई आपल्या मुलाला जीव वाचवण्यासाठी पळून जाण्यास सांगत होती. या आरोपीने आपल्या पुतण्यालाही सोडलं नाही. त्याच्यावरही कुऱ्हाडीने वार केले. ज्यामुळे तोदेखील जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर आहे.
धक्कादायक म्हणजे (Shocking Viral Video) हत्येची घटना भररस्त्यात घडली, मात्र लोक केवळ बघत उभे होते. कोणीही मदतीसाठी पुढे आलं नाही. सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. भौती भागात राहणारा आरोपी राजू भार्गव आपल्या विधवा वहिणी मंजुलता भार्गव घराजवळ बसण्यासाठी दगडाची जागा तयार करीत होता. मंजुलताचा मोठा मुलगा विनयने बसण्याची जागा थोडी लांब करण्यास सांगितली. यावरुन राजू वाद घालू लागला. यादरम्यान आरोपी राजूचा मुलगा राधाशरणदेखील तेथे आला. नंतर मात्र तिघांमध्ये वाद सुरू झाला आणि भांडण वाढू लागलं. राजू आणि त्याचा मुलगा राधाशरण कुऱ्हाड घेऊन आला आणि विनयवर हल्ला करू लागला.
हे ही वाचा-धक्कादायक! मुलाने केला वडिलांच्या प्रेयसीचा खून, रोजच्या भांडणांना वैतागून वार
विनय आणि राजू यांच्यामध्ये जेव्हा वाद सुरू होते, त्यावेळी मंजुलता स्वयंपाक करीत होती. भांडणाचा आवाज ऐकून ती बाहेर आली आणि मुलाला वाचवू लागली. यादरम्यान आरोपी पिता-पूत्र अधिक चिडले. ते कुऱ्हाडीने मंजुलतावर हल्ला करू लागले. जेव्हा हे दोघे मंजुलतावर हल्ला करीत होते, तेव्हा ती मुलांना येथून पळून जाण्यास सांगत होती. मात्र आरोपींना त्यांनाही सोडलं नाही. विनयने कसंबसं पळून जाऊन आपला जीव वाचवला. मात्र बाप-मुलाने मंजुलता आणि तिचा दुसरा मुलगा गिर्राजवर हल्ला केला.
कौटुंबिक वादातून दिराने वहिनीवर कुऱ्हाडीने केला हल्ला, भररस्त्यात महिलेने सोडला जीव. मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील भयावह VIDEO pic.twitter.com/p1hvcVOvlX
— News18Lokmat (@News18lokmat) December 9, 2021
यातून स्वत:चा बचाव करण्यासाठी दोघेही पळू लागले. मात्र जखमी मंजुलता फार पळू शकली नाही आणि ती मध्येच पडली. यावेळी आरोपी बाप-लेकांनी तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. आईने जागेवरच जीव सोडला. तर मुलगा गिर्राज गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Shocking video viral