मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार, चालत्या कारने अचानक पेट घेतला, घटनेचा Live VIDEO

नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार, चालत्या कारने अचानक पेट घेतला, घटनेचा Live VIDEO

नाशिकमध्ये भर रस्त्यावर बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. रस्त्याने चालणाऱ्या एका कारने अचानक पेट घेतला.

नाशिकमध्ये भर रस्त्यावर बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. रस्त्याने चालणाऱ्या एका कारने अचानक पेट घेतला.

नाशिकमध्ये भर रस्त्यावर बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला. रस्त्याने चालणाऱ्या एका कारने अचानक पेट घेतला.

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 13 एप्रिल : नाशिकमध्ये आज संध्याकाळी भर रस्त्यावर बर्निंग कारचा (Burning Car) थरार बघायला मिळाला. रस्त्याने चालणाऱ्या एका कारने अचानक पेट घेतला. गाडीला भीषण आग (fire) लागली. या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत गाडीतील प्रवासी आणि चालक सुदैवाने बचावले आहेत. पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटना घडत असताना बघ्यांची मोठी गर्दी परिसरात जमली. घटनेनंतर काही जणांनी तातडीने अग्निशमन दलाला (Fire Brigade) माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. पण या घटनेत गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे.

संबंधित घटना ही नाशिकच्या तारवाला नगर परिसरात घडली. चालत्या गाडीने अचानक पेट घेतला. एलपीजी गॅसवर असलेली मारुती कंपनीची गाडी या घटनेत जळून खाक झाली. गाडीत गॅस भरण्यासाठी जात असतानाच संबंधित अनपेक्षित दुर्घटना घडली. गाडीला आग लागताच गाडीतील चालक आणि इतर सहकारी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित घटनेनंतर गाडीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

(गुणरत्न सदावर्तेंना झटका, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सरकारी वकिलांचे कोर्टात धक्कादायक खुलासे)

बीडमध्ये वारकऱ्यांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू

नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला असताना बीडमधून अपघाताची एक वाईट बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या चैत्र वारीसाठी गेलेल्या परभणीच्या वारकऱ्यांच्या गाडीचा बुधवारी दुपारी चार वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीत मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झाले. त्यापैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित अपघात हा तीन वाहनांमध्ये झाला. पंढरपूरची चैत्र वारी करुन काही वारकरी पिकअप गाडीने परभणीच्या दिशेला रवाना झाले होते. पण बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुडजवळ खामगाव-पंढरपूर या दिंडी मार्गावर मारकऱ्यांची पिकअप, एक ट्रॅक्टर आणि मोरटरसायकल यांचा तिहेरी अपघात झाला. अपघात प्रचंड भीषण होता. हा अपघात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात परभणीचे नारायण ताठे आणि चंद्रभान डाके या रहिवाशांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातात 15 जण जखमी झाले. यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

First published:

Tags: Accident, Burning car, Nashik