मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /nashik : नाशिकमध्ये आणखी एका बसला आग, वणी गडावर धावत्या ST बसने घेतला पेट

nashik : नाशिकमध्ये आणखी एका बसला आग, वणी गडावर धावत्या ST बसने घेतला पेट

 बसमधील सर्व प्रवाशांनी लगेच बसमधून खाली उड्या टाकल्या. त्यामुळे बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले

बसमधील सर्व प्रवाशांनी लगेच बसमधून खाली उड्या टाकल्या. त्यामुळे बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले

बसमधील सर्व प्रवाशांनी लगेच बसमधून खाली उड्या टाकल्या. त्यामुळे बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक, 08 ऑक्टोबर : नाशिक औरंगाबाद महामार्गावर खासगी बस आणि टँकरच्या अपघातानंतर आग लागल्यामुळे बसमधील 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला. ती घटना ताजी असतानाच वळी गटावर धावत्या एसटी बसला आग लागली. सुदैवाने वेळीच प्रवाशांनी बाहेर उड्या टाकल्या, त्यामुळे जीवितहानी झाली नाही.

आज दुपारी नाशिकच्या वणी गडावर ही घटना घडली. नांदुरीहुन वनी गडावर ही बस येत होती. गडाकडे येत असताना अचानक बसला आग लागली. धावत्या बसने पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली.

बसमधील सर्व प्रवाशांनी लगेच बसमधून खाली उड्या टाकल्या. त्यामुळे बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले आहे. स्थानिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

(nashik bus accident : नाशिक बस अपघाताची धक्कादायक माहिती समोर)

दरम्यान, आज पहाटे खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. आरटीओ आणि पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. बसमध्ये ओव्हरलोड प्रवासी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रवासी बस ट्रकचा डिझेल टँकरवर आदळल्याने स्फोट होऊन बसला आग लागण्याची माहिती समोर आली आहे.

(मोठी दुर्घटना! नाशिकमध्ये खासगी बसने घेतला पेट; 10 जणांचा आगीत होरपळून मृत्यू, VIDEO)

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. छगन भुजबळ यांनी जिल्हा रुग्णालय ला भेट देऊन अपघातग्रस्तांची विचारपूस केली. अपघात अत्यंत दुर्दैवी आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांशी मी बोललो कदाचित मुख्यमंत्री काही वेळाने नाशिकला येतील. रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही, तरी मिळेल त्या गाडीने जखमींना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. ज्या ठिकाणी अपघात झाले त्या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतील तर त्या ठिकाणी उपाययोजना करावे. अपघातग्रस्त बसमध्ये जर क्षमतेपेक्षा जास्त लोक असतील तर त्या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

नाशिक बस अपघातातील मृतांचा वारसांना 5 लाखांची मदत

दरम्यान, नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक येथील अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

First published:
top videos

    Tags: Marathi news