मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अंत्यविधीसाठी आलेल्या 10 जणांना भरधाव कारने उडवलं; नाशकातील मध्यरात्रीचा थरार

अंत्यविधीसाठी आलेल्या 10 जणांना भरधाव कारने उडवलं; नाशकातील मध्यरात्रीचा थरार

शितळादेवी मंदिरासमोरील अमरधामला सिटी लिंक बस वाहकाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव वेगानं आलेल्या कारनं समोरून जबर धडक दिल्याची घटना घडली.

शितळादेवी मंदिरासमोरील अमरधामला सिटी लिंक बस वाहकाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव वेगानं आलेल्या कारनं समोरून जबर धडक दिल्याची घटना घडली.

शितळादेवी मंदिरासमोरील अमरधामला सिटी लिंक बस वाहकाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव वेगानं आलेल्या कारनं समोरून जबर धडक दिल्याची घटना घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नाशिक 29 ऑक्टोबर : नाशिकमधून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेत अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव कारने धडक दिली. नाशिकच्या अमरधाम समोर ही घटना घडली आहे. या अपघातात 15 जण जखमी झाले आहेत. यात कारमधील चार तर रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या दहा जणांचा समावेश आहे.

बीड : गुढ आवाजाने गावकरी हैराण, भीतीचे वातावरण; रात्र घराबाहेर जागून काढण्याची वेळ Video

भद्रकाली हद्दीच्या जुन्या नाशकातील मध्यरात्रीच्या या घटनेचा थरार हा अक्षरशः थरकाप उडवणारा होता. शितळादेवी मंदिरासमोरील अमरधामला सिटी लिंक बस वाहकाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या दहा जणांना भरधाव वेगानं आलेल्या कारनं समोरून जबर धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत रस्त्यावर उभे असलेले दहा तर कारमधील पाच असे पंधरा जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सिडकोतील रहिवासी आणि सिटीलिंक बसवाहक असलेल्या मकरंद पंचाक्षरींचा मृत्यू झाल्यानं मध्यरात्री त्यांच्या अंत्यविधीसाठी नाशिक अमरधामला अनेक सिटीलिंक कर्मचारी आले होते. त्यातील काहीजण बाहेर रस्त्यावर उभे असताना पंचवटी अमरधामकडून नानावलीकडे भरधाव वेगानं जाणारी कार समोर उभा असलेल्या घोळक्यावर जाऊन धडकली.

कारला सेफ्टी रेटिंग कसं मिळतं? 5 स्टार मिळवण्यासाठी कोणती फीचर्स आवश्यक आहेत, जाणून घ्या

यात रस्त्यावर उभे असलेले दहाजण तर कार चालकासह गाडीत बसलेले पाच असे एकूण पंधरा जण जखमी झाले. भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत सपकाळे, यासह कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. जखमी नागरिकांना खाजगी वाहनात बसवून जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारसाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची घटना घडल्यानंतर परिसरात नागरिकांचा मोठा जमाव जमला होता. या अपघातात दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले असून पंधरापैकी दहाजण सिटीलिंक कर्मचारी असल्याचे समजते.

First published:

Tags: Major accident, Nashik