नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर: जगभरातील रस्ते अपघातांची वाढती संख्या पाहता कार्सना सेफ्टी रेटिंग देण्याचे नियम आता अधिक कडक होत आहेत. अलीकडेच, कारला सुरक्षा रेटिंग देणारी संस्था ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅमने (Global NCAP नवीन नियम लागू केले होते. यामध्ये गाड्यांना चांगलं रेटिंग देण्यासाठी काही नवीन निकषांचा समावेश करण्यात आला आहे. या नवीन नियमांसह 5 स्टार रेटिंग मिळवणाऱ्या फोक्सवॅगन तैगुन आणि स्कोडा कुशाक पहिल्या कार आहेत.
ग्लोबल NCAP ने जुलै 2022 मध्ये कारच्या टेस्टिंगसंबंधी नवीन नियम प्रसिद्ध केले होते. यामध्ये काही नवीन पद्धतींचाही समावेश करण्यात आला आहे. पूर्वी कारची फक्त फ्रंट इम्पॅक्ट टेस्ट केली जायची, पण आता कारचं पुढून, मागून आणि बाजूनेही टेस्टिंग केलं जातं. सेफ्टी रेटिंगमध्ये कार्सचे अॅक्टिव्ह सेफ्टी फीचर्स विचारात घेतले जातात. जीएनसीएपीचे नवीन नियम काय आहेत आणि ते कसे कार्य करतात? ते जाणून घेऊया.
जीएनसीएपीचे नवीन प्रोटोकॉल
नवीन क्रॅश टेस्ट प्रोटोकॉलसह जुनी फ्रंटल इम्पॅक्ट टेस्ट तीच असते. पण चेस्ट लोड रीडिंगचं बारकाईने निरीक्षण केलं जाईल. या व्यतिरिक्त, साइड-इम्पॅक्ट टेस्ट आता अनिवार्य आहे आणि जर एखादी कार फ्रंटल क्रॅश टेस्टमध्ये गुण मिळवू शकली नाही, तर जीएनसीएपीला साइड-इम्पॅक्ट रेटिंगसाठी कारचं टेस्टिंग करण्यास भाग पाडलं जाणार नाही. तसंच, साइड इफेक्ट टेस्टसाठी मुलांचा क्रॅश टेस्ट डमी वापरणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे.
हेही वाचा - Car Care Tips: कितीदा सांगायचं भाऊ! ‘या’ छोट्या चुकांनी कारच्या सस्पेन्शनची लागते वाट, वेळेतच व्हा सावध
टेस्टिंग पॉइंट्स कसे मिळणार
याशिवाय, अॅडल्ट सुरक्षा जुन्या 16 पॉइंट्सऐवजी 34 पॉइंट्सवर आधारित असेल. ज्यांना पुढे तीन सेगमेंटमध्ये विभागलं जाईल. यामध्ये फ्रंट इफेक्टसाठी 16 पॉइंट्स, साइड-इम्पॅक्ट टेस्टिंगसाठी 16 पॉइंट्स आणि सीट बेल्ट रिमाइंडरसाठी 2 पॉइंट्स आहेत. दोन पूर्ण नंबर मिळवण्यासाठी कारमध्ये सर्व सीटसाठी सीट बेल्ट रिमाइंडर असणं आवश्यक आहे.
‘या’ अटी पूर्ण करणं गरजेचं
याशिवाय कारचं पूर्ण रेटिंग मिळण्यासाठी त्यांना काही इतर अटी पूर्ण कराव्या लागतील, ज्यामध्ये पोल साइड इम्पॅक्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि पादचाऱ्यांची सुरक्षा यांचा समावेश आहे. जर एखाद्या कारला 5 स्टार रेटिंग मिळवायचं असेल तर या सर्व अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. या सर्व अटी पूर्ण केल्यानंतर त्या ती कार 5 स्टार रेटिंग मिळवण्यास पात्र असेल.