जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बीड : गुढ आवाजाने गावकरी हैराण, भीतीचे वातावरण; रात्र घराबाहेर जागून काढण्याची वेळ Video

बीड : गुढ आवाजाने गावकरी हैराण, भीतीचे वातावरण; रात्र घराबाहेर जागून काढण्याची वेळ Video

बीड : गुढ आवाजाने गावकरी हैराण, भीतीचे वातावरण; रात्र घराबाहेर जागून काढण्याची वेळ Video

या गावातील काही दृश्यही व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहेत.

  • -MIN READ Parli,Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 28 ऑक्टोबर : बीड जिल्ह्यातून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. परळी तालुक्यातील परचुंडी मलनाथपुर परिसराला वारंवार अचानक जमिनीतुन गुढ आवाज येत आहे. त्यामुळे भिंतीला तडे व पत्रे हादरल्याच्या घटना घडत आहेत. नेमकं काय घडलं - परचुंडी मलनाथपुर परिसरातील जमीन गेली चार दिवसांपासून गुढ आवाजाने हादरली आहे. भिंतीला तडे व पत्र्याचा आवाज आला असे जाणवल्याचे या भागातील नागरिक सांगत आहेत. दरम्यान, गावकऱ्यांनी गेली चार दिवस रात्र घराबाहेर उघड्यावर जागून काढली आहे. नागरिकांनी रात्र जागून काढली - या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन दिवाळीत नागरिकांना घरा बाहेर रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भूगर्भ तज्ञांनी सखोल तपासणी करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. तर या गावातील काही दृश्यही व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहेत.

हेही वाचा -  Video : पुण्याच्या डिजेवाला बाबुने वाजवलं राष्ट्रवादीचं गाणं; चंद्रकांत पाटलांची अशी होती रिअॅक्शन लातूरच्या हासोरी गावात भूगर्भातून येतोय गूढ आवाज -  लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील सीमावर्ती भागात असलेल्या हासोरी या गावात मागच्या महिन्यात जमिनीच्या भूगर्भातून गूढ आवाज येत असल्यानं आणि भूकंपाचे सौम्य धक्के देखील जाणवल्यानं या गावातील नागरिक भयभीत झाले होते. ही बातमी पसरताच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हासोरी गावातील पाहणी करत नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन केले. त्याच बरोबर औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी देखील हासोरीत जाऊन गावाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: beed news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात