प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ, नाशिक 23 जुलै : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा टोल व्यवस्थापनाने थांबवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. यानंतर या घटनेविरोधात संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली. अमित ठाकरे यांना अर्धा तास ताटकळत ठेवल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी टोलनाकाच फोडला. अमित ठाकरे आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी 22 जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगरहून सिन्नरकडे समृद्धी महामार्गाहून येत होते. यावेळी सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर अमित ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. त्यांना आर्धा तास थांबवलं गेलं. ओळख सांगूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. Amit Thackeray : 4 तास वाट पाहून अमित ठाकरे फक्त 20 सेकंद थांबले; नाराज कार्यकर्त्यांनी फाडले पोस्टर टोलनाका कर्मचाऱ्यांच्या अरेरावी आणि गैरवर्तनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. मध्यरात्री नाशिक शहराचे शहराध्यक्ष दिलीप दातीर तसंच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. तोडफोडीची ही घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली
टोलनाक्यावर अमित ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. यानंतर संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली. pic.twitter.com/gk3HmEfkGd
— News18Lokmat (@News18lokmat) July 23, 2023
नाराज कार्यकर्त्यांनी फाडले अमित ठाकरेंचे पोस्टर - दुसऱ्या एका घटनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे दोन दिवसांच्या अहमदनगर दौऱ्यावर आले. मात्र, मनसेच्या महासंपर्क अभियान पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठकीअगोदर मोठी नाराजी झाल्याचं बघायला मिळालं. शिर्डीजवळील राहाता शहरात मनसे कार्यकर्त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. मात्र, अमित ठाकरे राहाता शहरात केवळ 20 सेकंद थांबल्याने कार्यकर्ते नाराज झाले. स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यांनी पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केलं.