जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Amit Thackeray : 4 तास वाट पाहून अमित ठाकरे फक्त 20 सेकंद थांबले; नाराज कार्यकर्त्यांनी फाडले पोस्टर

Amit Thackeray : 4 तास वाट पाहून अमित ठाकरे फक्त 20 सेकंद थांबले; नाराज कार्यकर्त्यांनी फाडले पोस्टर

नाराज कार्यकर्त्यांनी फाडले पोस्टर

नाराज कार्यकर्त्यांनी फाडले पोस्टर

Amit Thackeray : अमित ठाकरे शिर्डी चौऱ्यावर आहेत. चार तास वाट बघूनही अमित ठाकरे फक्त 20 सेकंद थांबल्याने मनसे कार्यकर्ते नाराज झाले.

  • -MIN READ Ahmadnagar,Maharashtra
  • Last Updated :

हरीष दिमोटे, प्रतिनिधी अहमदनगर, 22 जुलै : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे दोन दिवसांच्या अहमदनगर दौऱ्यावर आले आहे. मात्र, मनसेच्या महासंपर्क अभियान पदाधिकारी आणि कार्यकर्ता बैठकीअगोदर मोठी नाराजी झाल्याचं बघायला मिळालं. शिर्डीजवळील राहाता शहरात मनसे कार्यकर्त्यांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. मात्र, अमित ठाकरे राहाता शहरात केवळ 20 सेकंद थांबल्याने कार्यकर्ते झाले नाराज झाले. स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यांनी पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केलं आहे. काय आहे प्रकरण? मनसे नेते अमित ठाकरे अहमदनगरहून शिर्डीकडे येत असताना त्यांचा जागोजागी कार्यकर्ते स्वागत सत्कार करत होते. अमित ठाकरे राहाता शहरात येणार असल्याने कार्यकर्ते चारपाच तासांपासून वाट बघत होते. त्यांचे जंगी स्वागत तर होणारच होते, सोबतच एका फलकाचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, अमित ठाकरेउद्घाटन न करता निघून गेल्याने संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी तो फलक स्वतः फाडत निषेध व्यक्त केला. यावेळी पक्षाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे.

जाहिरात

अमित ठाकरे यांनी अहमदनगर येथे विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शहरातील शासकीय विश्रामगृहात अमित ठाकरेंनी शहरातील विद्यार्थ्यांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मनविसेच्या संपर्क अभियानाच्या माध्यमातून अमित ठाकरेंनी 35 विधानसभा मतदारसंघात 7 हजार विद्यार्थ्यांशी आतापर्यंत संवाद साधलाय. वाचा - ‘आमच्यासोबत या तरच मैत्री टिकेल’ मुश्रीफांची सतेज पाटलांना थेट ऑफर, पाटील म्हणाले.. अमित ठाकरे साई चरणी मनसेचे युवा अध्यक्ष अमित ठाकरे यांनी साईदर्शनाला हजेरी लावली. अमित ठाकरे यांनी साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले असून पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी दोन दिवस अमित ठाकरे अहमनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. रविवारी दिवसभर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी अमित ठाकरे घेणार असून पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे. येवल्यातील पदाधिकारी मेळाव्यातून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री हे सतत 2 दिवसांनी दिल्लीला जातात. महाराष्ट्राला तोडण्याचं राजकारण सुरू असून, महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि अलिबाबा महाराष्ट्राला लुटतायत अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar , MNS
  • First Published :
जाहिरात
जाहिरात