जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मालेगावात भीषण अग्नितांडव; अनेक यंत्रमाग कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी, घटनास्थळावरील VIDEO

मालेगावात भीषण अग्नितांडव; अनेक यंत्रमाग कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी, घटनास्थळावरील VIDEO

मालेगावात भीषण अग्नितांडव; अनेक यंत्रमाग कारखाने आगीच्या भक्ष्यस्थानी, घटनास्थळावरील VIDEO

या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालं असल्याचं समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मालेगाव 05 नोव्हेंबर : नाशिकमध्ये आगीच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाही. आता नाशिकच्या मालेगावमधील द्याने शिवारात एक मोठी दुर्घटना घडली. यात अनेक यंत्रमाग कारखान्यांना आग लागल्याने भीषण अग्नितांडव पाहायला मिळाला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालं असल्याचं समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हातात चाकू आणि पिस्तूल घेऊन भाजप नेत्याच्या घरावर हल्ला, नाशिकमधील थरारक VIDEO या घटनेत आगीने अनेक कारखान्यांना भक्षस्थानी घेतलं आहे. यात लाखोंचे नुकसान झालं आहे. घटनेची काही व्हिडिओही समोर आले आहेत. ज्यामध्ये आगीचे लोट पाहायला मिळतात. यावरुनच घटनेची भीषणता लक्षात येते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. दोन दिवसांपूर्वीच आगीची घटना - नाशिकमध्ये दोन दिवसांआधीच आगीची आणखी एक घटना समोर आली होती. यात एका फर्निचर मॉलसह भंगार गोदामाला आग लागली होती. आग लागली त्यावेळी फर्निचर मॉलमध्ये आठ ते दहा कामगार झोपलेले होते. मात्र, त्यांना वेळीच जाग आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, या आगीतही लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं. अंत्यविधीसाठी आलेल्या 10 जणांना भरधाव कारने उडवलं; नाशकातील मध्यरात्रीचा थरार ही घटना नाशिकच्या वडनेर-पाथर्डी रोडवर घडली होती. या आगीच्या घटनेत संपूर्ण मॉलसह भंगार गोदाम जळून खाक झाले. तर, आजच्या घटनेतही लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पहाटे लागलेली ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: fire , nashik
  • First Published :
जाहिरात
जाहिरात