मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nashik Major Accident : टायर फुटले, कार डिव्हायडर तोडून उडाली, भयानक अपघातात एकाच कुटुंबातील चौघे संपले

Nashik Major Accident : टायर फुटले, कार डिव्हायडर तोडून उडाली, भयानक अपघातात एकाच कुटुंबातील चौघे संपले

मुंबई -आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ असलेल्या पंढरपूरवाडीसमोर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मुंबई -आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ असलेल्या पंढरपूरवाडीसमोर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मुंबई -आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ असलेल्या पंढरपूरवाडीसमोर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक, 08 मार्च : मुंबई -आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ असलेल्या पंढरपूरवाडीसमोर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबली होती. दरम्यान या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने अपघात प्रवण क्षेत्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज (दि.08) बुधवारी दुपारी चारच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील इगतपूरीजवळ असलेल्या पंढरपुरवाडीसमोर नाशिकहून मुंबईच्या दिशेने एक चार चाकी गाडी जात होती. ही कार ( एम. एच 04 एफ  ए. 8291 ) भरधाव वेगाने जात असताना कारचा पुढील टायर फुटला. या दरम्यान कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही कार थेट उडून डिव्हायडर क्रॉस करून विरुद्ध बाजूला आली.

होळी साजरी करून तो नदीत उतरला पण पोलिसांना थेट मृतदेहच मिळाला, अभियंत्यासोबत पुण्यात धक्कादायक घटना

दरम्यान, मुंबईहून नाशिककडे अपघातग्रस्त वॅगनर कार घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर जोरदार आदळली. यामध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील एका लहान मुलीसह एक महिला व दोन पुरुष जागेवरच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आहे.

रस्त्यात सर्वत्र गाडीच्या काचा पसरल्या होत्या. मुंबईकडे जाणाऱ्या कुटूंबावर काळाचा घाला आल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत होते. दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की क्षणात होत्याच नव्हतं झालं.

इगतपुरीजवळ पंढरपूरवाडी समोर महामार्गावरच सर्वत्र गाडीच्या काचा आणि रक्ताळलेल्या अवस्थेत अपघातग्रस्तांना पाहून अपघात स्थळी असलेल्या नागरिकांच्या अंगावर काटा आल्याचे दिसून येत होते. या भयंकर अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

कोल्हापुरात मुलाची चोरी, 48 तासात सोलापुरात लागला छडा, तपासानंतर समोर आलं धक्कादायक वास्तव

तर एक जण गंभीर जखमी आहे. या जखमी असलेल्या अपघातग्रस्ताला एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

First published:
top videos

    Tags: Accident, Car crash, Major accident, Nashik, Road accident