मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /कोल्हापुरात मुलाची चोरी, 48 तासात सोलापुरात लागला छडा, तपासानंतर समोर आलं धक्कादायक वास्तव

कोल्हापुरात मुलाची चोरी, 48 तासात सोलापुरात लागला छडा, तपासानंतर समोर आलं धक्कादायक वास्तव

कोल्हापुरातून एका 6 वर्षांच्या चिमुरड्याची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी 48 तासांमध्ये लावला आहे.

कोल्हापुरातून एका 6 वर्षांच्या चिमुरड्याची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी 48 तासांमध्ये लावला आहे.

कोल्हापुरातून एका 6 वर्षांच्या चिमुरड्याची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी 48 तासांमध्ये लावला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 7 मार्च : कोल्हापुरातून एका 6 वर्षांच्या चिमुरड्याची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिर परिसरामधून एका दाम्पत्याने मुलाला चोरलं होतं. पोलिसांनी अवघ्या 48 तासांमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जवळा गावातून या मुलाची सुटका केली आहे.

या मुलाच्या चोरीची दृष्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती, यानंतर मुलाला शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं होतं, त्यामुळे पोलिसांनी तब्बल 100 ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं.

कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरापासून सुरू झालेला हा प्रवास सोलापूर जिल्ह्यातल्या जवळा गावापर्यंत पोहोचला. तिथे जाऊन मुलाची सुटकाही करण्यात आली. या प्रकरणी आरोपी मोहन शितोळे आणि त्याची पत्नी छाया शितोळे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपी दाम्पत्याला मुलं नाही, त्यामुळे त्यांनी या मुलाला आमिष दाखवलं आणि त्याला चोरून नेलं.

48 तासांमध्ये आरोपींना अटक करून मुलाची सुटका केल्यामुळे पोलिसांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला आहे. मागच्या काही काळामध्ये मुलांना चोरून नेणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. या मुलांचा शोध घेणं पोलिसांसाठीही बरेच वेळा आव्हानात्मक काम असतं, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मुलांचा हात न सोडलेलंच बरं.

First published:
top videos