Home /News /maharashtra /

Nashik Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, भरधाव Kia Sonet कार पुलावरुन खाली कोसळली, VIDEO

Nashik Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, भरधाव Kia Sonet कार पुलावरुन खाली कोसळली, VIDEO

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात; भरधाव कार पुलावरुन कोसळली, Kia Sonet चक्काचूर, VIDEO

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात; भरधाव कार पुलावरुन कोसळली, Kia Sonet चक्काचूर, VIDEO

Accident on Mumbai - Nashik highway: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 21 मे : मुंबईहून धुळ्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव कारला अपघात (car accident on Mumbai-Nashik Highway) झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील उड्डाण पुलावर हा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जात असलेली किया सोनेट कार (Kia Sonet Car) (क्र.एम एच 46 बी झेड 6011) ही कार हॉटेल दिव्य अभिलाशा समोरील पूल चढत असताना थेट खाली कोसळली. कारचालकाचे नियंत्रण सुटून कार पलटी होत पुलावरून खाली कोसळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. पालघर येथील सुनील जैन आणि त्यांच्यासोबत दोन महिला या गाडीतून प्रवास करत होत्या. अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस, अग्निशमन दलाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातात गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. सोलापुरात एसटी थेट शेतात कोसळली एसटी बसला सोलापूर जिल्ह्यात काल (20 मे) भीषण अपघात (ST bus accident in Solapur) झाला. एसटी बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ही बस अक्कलकोट (Akkalkot)हून कल्लाप्पावाडीकडे जात होती आणि त्याच दरम्यान एसटीला अपघात झाला. एसटी बस रस्त्यावरुन थेट शेजारील शेतात जाऊन पलटली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी जवळ एसटी बस पलटली आहे. या बसमध्ये एकूण 45 ते 50 प्रवासी प्रवास करत होते. खराब रस्त्यामुळे एसटी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं बोललं जात आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. तर अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रपुरात भीषण अपघात, 9 जणांचा होरपळून मृत्यू चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे काल (20 मे) झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अजयपूर गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला होता. पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर भीषण आग लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटून आग भडकली. या अपघातात 9 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Accident, Maharashtra News, Nashik

    पुढील बातम्या